डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे. का नसावा ? त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला; त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला : त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले.
मीच हे सांगितलेपाहिजे अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले - गोंडवनातील प्रियवंदा ही त्यांची १९२६ ची कादंबरी. समाजशास्त्रीय घरकुट्टे घराण्याचा इतिहास असा जोडमथळा असलेल्या या कादंबरीतील बिंबा म्हणते , राष्ट्र म्हणजे बायका, पुरुष नव्हे. ही कादंबरीकाराचीच भूमिका ; ती आजच्या समाजाने काळजात आणि कपाटात जपली पाहिजे. - डॉ.
द. भि. कुलकर्णी हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours