Skip to product information
Gramophone Girls Vol 1 & 2 (Set) | ग्रामोफोन गर्ल्स भाग १ व भाग २ (संच) by Dr Nandita Date |  डॉ. नंदिता दाते
Rs. 900.00
Pages: 568
Language: Marathi

सोळाव्या शतकातील अविभाजित हिंदुस्थानाच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलेल्या आणि पुढे अठराव्या शतकात केवळ उच्चभ्रू समाजासाठी आपली कला सादर करणाऱ्या या प्रतिभावान कलावंतांना जगाने 'तवायफ' म्हणून ओळखलं.

लाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस, पटना, कलकत्ता ते मुंबई... या शहरांमधून तवायफांच्या तहजीब, मौसिकी आणि अभिजात कलापरंपरेचा प्रवास घडत गेला. एकेकाळी समाजात मान, प्रतिष्ठा आणि प्रभाव असलेल्या या कलावंतांची परंपरा मात्र बदलत्या सामाजिक वास्तवात हळूहळू कलंकित झाली, उपेक्षित ठरली आणि विस्मृतीच्या पडद्याआड गेली.

पण इतिहासाची एक महत्त्वाची नोंद आजही अजरामर आहे—एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ग्रामोफोनच्या तबकडीवर ध्वनिमुद्रित झालेले पहिले स्वर हे तवायफांचेच होते.

जानकीबाई, गौहरजान, मेहबूबजान, कज्जन, मोतीबाई, असगरी, सिद्धेश्वरी देवी अशा असंख्य गायिकांनी ठुमरी, दादरा, गझल आणि इतर अभिजात संगीतप्रकार घराघरांत पोहोचवले. लाखेच्या तबकड्यांवर कोरलेले त्यांचे स्वर म्हणजे काळावर उमटलेली अमिट स्वर-स्वाक्षरी.

तवायफांच्या संघर्षमय आयुष्याचा, शाही दरबारापासून कोठा, रंगमंच, ग्रामोफोन ध्वनिमुद्रिका आणि पुढे चित्रपटसृष्टीपर्यंतच्या त्यांच्या कलाप्रवासाचा हा अभ्यासपूर्ण आणि रोमहर्षक मागोवा...

'ग्रामोफोन गर्ल्स'

भाग १ – लाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस

भाग २ – गया–पटना, कलकत्ता, हैदराबाद, मुंबई

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Gramophone Girls Vol 1 & 2 (Set) | ग्रामोफोन गर्ल्स भाग १ व भाग २ (संच) by Dr Nandita Date | डॉ. नंदिता दाते

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like