Skip to product information
Grampanchayat Karbhar Va Karbhari
Sale price  Rs. 216.00 Regular price  Rs. 240.00
Pages: 128
Language: Marathi
Overview:
स्मार्ट ग्रामपंचायतीचं तंत्र आणि मंत्र ग्रामपंचायत : कारभार आणि कारभारी हे पुस्तक आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी मोलाची माहिती देणाऱ्या मित्राची भूमिका बजावतं. ग. शां. पंडित यांनी या पुस्तकाच्या लेखनामागची भूमिका स्पष्ट करताना मनोगतात लिहिलं आहे, गाव सुधारले तर देश सुधारेल , हा संत महंतांच्या विचारांचा गर्भितार्थ लक्षात घेऊन सध्याच्या शासनाने स्मार्ट सिटीप्रमाणेच स्मार्ट व्हिलेजची संकल्पना पुढे आणली आहे. आमचा गाव, आमचा विकास या योजनेच्या माध्यमातून निधीचा सुयोग्य वापर व्हावा व गावातील सर्वच घटकांना या विकासप्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी भागाच्या विकासाला पूरक वातावरण तयार होईल. यात शासकीय अधिकाऱ्यांपासून गावातल्या स्वयंसेवक व युवक कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला काय करावं लागेल, हे ग्रामपंचायत कारभार व कारभारी या पुस्तकात अतिशय सोपं करून लिहिलेलं आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like