वाचक केवळ मनोरंजन किंवा ज्ञानप्राप्तीसाठी वाचत नाही. आपले मन, विचार, व्यापक, प्रगल्भ व्हावे म्हणून वाचन होते. वाचनाने मन प्रफुल्लीत होते. मन विशाल होते आणि जीवनातील प्रत्येक प्रसंगाला तोेंड देण्याची क्षमता प्राप्त होते. ही दृष्टी विद्यार्थ्यांना वाचनाने मिळते. “वाचाल तर वाचल” याचे महत्त्व पटते. आधुनिक जगातील स्वयं विकासाचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे वाचन. वाचन हा विरंगुळाही आहे. वाचनाची सवय लागली म्हणजे त्यांच्या जीवनातील मानसिक उदासिनता दूर होण्यास मदत होते. त्यामुळे मन आनंददायी बनते. त्यांच्या अंगी दुःख पचवण्याची शक्ती निर्माण होते. म्हणजेच चांगला वाचक हा आपला भावनिक व बौद्धिक भूक वाचनाने भागवितो. ग्रंथालयीन व्यवस्थेमध्ये अलिकडच्या काळांत तांत्रिक आणि यंत्रचलित साधनांचा उपयोग अपरिहार्यपणे वाढला आहे. ‘ग्रंथालय आणि समाज’ या ग्रंथामध्ये ग्रंथालयाचा समाजाशी असलेला निकट संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथात ग्रंथालयाचा विकास, विविध प्रकारची ग्रंथालये, वाचन संस्कृतीचे महत्त्व, तसेच ग्रंथालय संघटनांची भूमिका यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. प्रस्तुत ग्रंथातील विविध प्रकरणांमधून ग्रंथालय आणि समाज यांच्यातील परस्पर संबंध समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours