Skip to product information
हाक शांततेसाठी | Hak Shantatesathi
Rs. 160.00
Pages: 96
Language: Marathi

ही हाक फक्त शांततेसाठी नाही, माणसाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी दिलेली ती हाक आहे. बोथट झालेल्या मानवी मनाला संवेदनशीलतेने घातलेली हाक आहे. क्रूर, महत्त्वाकांक्षी नेत्यांनी आणि राष्ट्रांनी जगावर लादलेल्या आणि आजही सुरू असलेल्या हिंसाचाराकडे बघूनसुद्धा न बघितल्यासारखे करणान्या सर्वसामान्य जनतेला सुबुद्ध करण्यासाठीची हाक आहे. पृथ्वीराज तौर यांनी युद्धाचा आक्रोश अत्यंत संयमाने आणि सार्थ शब्दांमध्ये व्यक्त केला आहे. हे पुस्तक शांततेवर विश्वास ठेवणाराला सक्रिय करू पाहतेच; पण युद्धपिपासू वृत्तीलाही आवाहन करते. यातल्या अनेक ओळी सुभाषितासारख्या आहेत. उदा. युद्ध डोळ्यांना आणि दृष्टीला दोघांनाही संपवून टाकतं.... माणसाच्या भविष्याची काळजी करणाऱ्या प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे. - ज्ञानेश्वर मुळे (आय.एफ.एस.) माजी राजदूत व सचिव, भारत सरकार ---------------------------------------- आजचं जग युद्धखोर आणि हिंसक का झालं आहे? हा प्रश्न जगभरच्या चौकस मुलांना नक्कीच पडत असणार. त्याचं उत्तर पृथ्वीराज तौर यांच्या 'हाक शांततेसाठी' या पुस्तकातून समाधानकारकरीत्या मिळू शकेल. हे पुस्तक बालकुमारांच्या निरागस स्वप्नांना सकारात्मक विचारांचे नवे पंख देऊ शकेल. हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक कुमार वाचकांना हे सांगायचं आहे की, यातील प्रत्येक कथेतून बोध घ्या, विचार करा आणि उद्याचं तुमचं जग आज आहे, त्यापेक्षा अधिक सुंदर करण्याचा निश्चय करा; सर्वांशी प्रेमाने वागा आणि कुणाचा चुकूनही द्वेष करू नका, मग पाहा, जगात पुन्हा कधीच युद्ध होणार नाही आणि मुलांची निरागस स्वप्नं उद्ध्वस्त होणार नाहीत. साने गुरुजींच्या 'श्यामची आई' आणि गो. नि. दांडेकरांच्या 'आईची देणगी'चे स्मरण करून देणारे प्रेरक व बोधपर पुस्तक म्हणून 'हाक शांततेसाठी' महत्त्वाचे आहे. लक्ष्मीकांत देशमुख (आय.ए.एस.) अध्यक्ष, मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

हाक शांततेसाठी | Hak Shantatesathi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like