Skip to product information
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 399.00
Overview:
* ज्योतीने आपल्या जन्मजात आजाराचे भांडवल न करता नृत्य, ट्रेकिंग, कुकिंग हे आपले छंद जोपासले. येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं! हे आयुष्याचे सूत्र ठरवून ज्योती जीवन कशी जगली, याचे कथन म्हणजे हे पुस्तक! *मरण आज येईल की उद्या येईल; हे सांगता येत नसताना मरणाला हुलकावणी देत ४६ वर्षांचे आयुष्य ज्योती जगली; ते केवळ तिच्या सकारात्मक विचारांवर! हे तिचे प्रेरणादायी आयुष्य येथे मांडले आहे. *कुटुंबीय, शिक्षक, मैत्रिणी, डॉक्टर या सर्वांना तिने आपलेसे केले. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हसत हसत आयुष्य कसे जगावे याचा आदर्शच तिने घालून दिला. * अभिनेते स्व. डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू यांची ती मानस कन्या होती! प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ तिची जगण्याची जिद्द पाहून तिला लढवय्या म्हणत! तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका नसीमा हुरजूक ह्या ज्योतीच्या स्फूर्तिस्थान होत्या! या सर्वांचे हृदयस्पर्शी वर्णन यामध्ये आहे. *आपल्यासारख्याच हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्यांना मदत व्हावी, यासाठी हृदय-ज्योत संस्थेची तिने स्थापना केली. दु:ख, वेदना बाजूला सारून आनंदी आयुष्य ज्योती जगली! खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा देणारा तिचा जीवनप्रवासाविषयीचे हे पुस्तक! * डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी सहज, सुंदर शब्दांत ज्योतीचे आयुष्य चितारले आहे. डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी समुपदेशन मानसशास्त्र (Counseling Psychology) या विषयात एम. ए . केले आहे . यासंबंधी ऑस्टिन , प्रिन्सटन आणि स्टॅनफोर्ड या आंतराष्ट्रीय विद्यापीठांमधून अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत . समुपदेशन हे डॉ. प्रतिभा यांचे आवडते कामअसल्याने त्यांनी मानसशास्त्रीय प्रथमोपचार यामध्ये पीएच . डी . संपादन केली . कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित ११ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available