आहार, निद्रा आणि व्यायाम या तीन गोष्टी निरोगी आरोग्याचा कणा आहेत. प्रतिकारशक्ती एकाकी विकसित होत नाही. ती विकसित होण्यासाठी आहार, निद्रा आणि व्यायाम यांचं संतुलन चोख असावं लागतं. या तीन घटकांतलं अन्नाचं सेवन सर्वाधिक महत्त्वाचं. चविष्ट, खमंग, चमचमीत खाण्याकडे प्रत्येकाचा स्वाभाविक ओढा असतो. त्यातून शरीराला पुरेसं पोषण मिळतंय क्वावर प्रतिकारशक्ती अवलंबून असते. जग जवळ आल्यामुळे सतत विविध ठिकाणी संचार, जगातल्या कोणत्याही भागातला कोणताही पदार्थ कुठेही उपलब्ध होण्याची झालेली सोय यांमुळे खाण्याच्या बाबतीत व्यक्ती लवचीक बनलेली आहे. परंतु त्याच्यातून प्रतिकारशक्ती किती विकसित होते आहे, याचा विचार थोडा मागे पडतो. कोविडमुळे प्रतिकारशक्तीचा मुद्दा एकदम ऐरणीवर आला आहे. या बाबतीत अधिक सजग बनवणारं 'इम्युनिटी बूस्टर' हे पुस्तक...
Pickup available at HO
Usually ready in 24 hours