Skip to product information
इतिहास - अर्थ व स्वरूप | Itihas - Artha Va Swarup
Sale price  Rs. 263.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 184
Language: Marathi

इतिहासकारांचे विचार, विचारप्रवाह आणि त्याचबरोबर त्यांची वर्तमान व गतकाळाविषयीची व्यापक अर्थाची समजउमज इतिहासातून प्रकट होत असल्याने आत्मप्रकटीकरणाचे, तसेच समाजमन व समाजमत निर्मितीचे प्रभावी माध्यम म्हणून इतिहासाकडे पाहिले जाते. अनेक इतिहासकारांनी दिलेल्या इतिहासाच्या विविध व स्थलकालसापेक्ष व्याख्या हे त्याचे पुरेसे आणि समर्पक असे उदाहरण ठरते. थोडक्यात, इतिहासकार आपल्या परिप्रेक्ष्यातून वर्तमान समाजाला गतकालीन समाजजीवनाची सफर घडवून आणतो. मात्र, उपलब्ध परिस्थितीतील अनेक विचार व विचारप्रवाहांतील आपले विचारदृष्टिकोन हे केवळ आणि केवळ एकच बाजू असून, याव्यतिरिक्तही अनेक साधकबाधक उर्वरित व्यापक व प्रगल्भ दृष्टिकोन अज्ञात आणि दुर्लक्षित राहिलेले आहेत. कदाचित याची जाणीव असूनही तो बर्‍याचदा आपल्या विचारांमध्ये भक्कमपणाची फक्त भरच घालण्याच्या प्रयत्नात असतो. या संपूर्ण पार्श्वभूमीवर अनेक वृत्ती, प्रवृत्ती व प्रकृतीच्या व्यक्ती-व्यक्तींनी बनलेल्या समाजजीवनाचे आणि त्यातील विविध समाजगटांचे बहुअंगी व बहुरंगी जीवनचित्र बराच काळ एकाच रंगाच्या काचेतून अनुभवल्यास ते पुढे पुढे स्पष्ट होत जाण्याऐवजी दिवसागणिक धूसर व अंधुक होण्याची अधिक संभावना असते आणि म्हणूनच समाजरूपी निसर्गात उपलब्ध उर्वरित रंगांची तोंडओळख व प्रारंभिक अनुभूती हे प्रस्तुत ग्रंथाचे प्रयोजन असून, इतिहासाचे विविध विचार व दृष्टिकोनांची इतिहासाच्या व्याख्या, स्वरूप व व्याप्तीच्या माध्यमातून कमी-अधिक मात्र मिळतेजुळते इतिहासचित्र रेखाटण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न इतिहासाचे विद्यार्थी, संशोधक व शिक्षकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी आशाही आहे...

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

इतिहास - अर्थ व स्वरूप | Itihas - Artha Va Swarup

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like