Skip to product information
Satyacha Shodh | Jeevan Geet by osho avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Author: Osho
Language: Marathi

सत्य असले तर स्वत:च्या आतमध्ये आहे. त्यामुळे इतर कोणाकडे मागून ते मिळणार नाही. सत्य कुठून शिकूनही घेता येत नाही. कारण आपण जे काही शिकत असतो ते बाहेरून शिकत असतो. आपण जे मागत असतो ते बाहेरून मागत असतो. सत्याला वाचूनही समजून घेता येत नाही. कारण आपण जे काही वाचतो ते बाहेरून वाचत असतो. सत्य असते आपल्या अंतरंगात- ना त्याला वाचायचे आहे ना मागायचे आहे, ना कोणाकडून शिकायचे आहे – त्याला खोदून काढायचे आहे.

त्या जमिनीला खोदायचे आहे, जिथे आपण उभे आहोत, तर ते खजिने प्राप्त होतील, जे सत्याचे खजिने आहेत. ओशो पुस्तकातील काही मुख्य विषय • खरी, वास्तविक स्वतंत्रता काय आहे? • शून्य हे पूर्णत्वाचे द्वार आहे. • जीवन एक स्वप्न आहे का? • संयमाचा अर्थ काय? ————————————————————————————————————————– म्ही जर जीवनाला विचारले- दगडांना, फुलांना, माणसांना, आकाशाला, ताऱ्यांना, सर्वांनाच! तुम्हाला सर्वांकडून उत्तरे मिळतील; पण जर तुम्ही विचारलेच नाही तर मात्र उत्तरे आपणहून मिळणार नाहीत. ज्ञान काही असे स्वत:हून कोणावर बरसत नसते.

त्याला शोधावेच लागते. आणि ते शोधण्यासाठी तुमच्या मनाची दारे उघडी असली पाहिजेत. जगाला पाहण्याचे दरवाजे बंद न करता उघडेच ठेवले पाहिजेत. त्यानंतर तुमच्याकडे चारही बाजूंनी जे काही येईल त्याचा समजूतदारपणे विचार करण्याची दृष्टीदेखील तुमच्याकडे असली पाहिजे. – ओशो पुस्तकातील काही महत्त्वाचे विषय • मृत्यूच्या भयापासून मुक्त होण्याचा मार्ग असू शकतो का? • तुमचे तुमच्या कामावर प्रेम आहे का? • अत्यंत शांत मन हे निरोगी असण्याचा मुख्य गाभा आहे. • स्वत:चेच प्रेक्षक असण्याचा अर्थ काय आहे? हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Satyacha Shodh | Jeevan Geet

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like