Skip to product information
Rajmata Jijau Marathi Book | Jhansichi Rani Lakshmibai by Raghuveersingh Rajput avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: -
Language: Marathi

एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये ! हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला. स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले.

दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच! झांसीची राणी! जिच्या केवळ नावानेच आपल्या अंत:करणात स्फुलिंग प्रज्यलित होते, अशी देदीप्यमान स्त्री, महाराणी व लढवय्या! तिचे सगळे आयुष्यच झंझावती होते. (आईविना पेशवांच्या घरात वाढलेली, भातुकलीपेक्षा, मुलांच्या साहस क्रीडांमध्येच रस घेणारी, भारतीय असल्याचा जाज्चल्य अभिमान बाळगतानाच ब्रिटिशांना धूळ चारण्याचे मनोरथ रचणारी मनिकर्णिका, अवघ्या 13 व्या वर्षी महाराणी बनते.

महाराणी लक्ष्मीबाई म्हणून प्रजाजनांच्या आदराला पात्र होते आणि राणी म्हणून सगळ्या कसोट्यांवर यशस्वी होण्याचा तिने अखेरपर्यंत प्रयत्न केले. स्त्री असण्याचे कोणतेही भांडवल न करता वा स्त्रीजन्म ही अडचण न मानता आपल्या अफाट शौर्याने ब्रिटिशांना पाणी मागायला लावतानाच अंतर्गत राजकीय व कौटुंबिक कलहांची वादळे कष्टी मनाने तरीही निधड्या छातीने परतून लावते.) पती गंगाधररावांच्या आकसिक निधनानंतर आलेले वैधव्य धीरोदात्तपणे झेलणारी ‘राणी लक्ष्मीबाई’ परकीयांपासून झांसीचे रक्षण हेच ध्येय उराशी बाळगते व 1857 च्या स्वातंत्र्य समरात सक्रिय भाग घेऊन हौताम्य पत्करते. सारेच विलक्षण आणि चित्तथरारक! तिचा हाच वादळी प्रवास या पुस्तकात अधोरेखित केला आहे. (प्रत्येक वाचकाच्या मनात देशप्रेमाची ज्योत जागविणारे व आपल्या महान इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाचा सांगणारे प्रेणादायी पुस्तक आज 150 वर्षांनंतरही तिची लोकप्रियता कशी अबाधित आहे याचीच साक्ष देते.) हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Rajmata Jijau Marathi Book | Jhansichi Rani Lakshmibai

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like