इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारी युद्धकांदबरी - कांचनबारी*
नाशिकजवळच्या चांदवड तालुक्यात आहे कांचना किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खिंड म्हणजे कांचनबारी अन् या खिंडीत झालेली लढाई म्हणजेच कांचनबारीची लढाई.
दोन्ही हातात पट्टे चढविलेल्या राजांनी मैदानावर केलेले सर्वात भयान युद्ध म्हणजेच कांचनबारी.
हजारो मुघलांच्या मढ्यांचा डोंगर जिथं उभं राहिला ते ठिकाण म्हणजेच कांचनबारी.
राजे रक्तात चिंब न्हाऊन निघाले ती लढाई म्हणजेच, कांचनबारी.
शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. राजे कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजगडाकडं निघाले. पण, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह कांचनबारीत येऊन उभा राहिला आणि सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.
ते युद्ध म्हणजेच कांचनबारीचे युद्ध.
साधू, शंभू, उंबरखिंड या कादंबरीचे लेखक नितीन अरूण थोरात घेऊन येत आहेत शिवाजी महाराजांवर लिहिलेली रोमांचक युद्ध कादंबरी, कांचनबारी.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours