पानिपतचा वैभवशाली इतिहास मिरवणाऱ्या नायकाची आधुनिक काळातील गोष्ट.
युद्धानंतर बलुचिस्तानात फरफट झालेल्या मराठ्यांच्या संघर्षाची गोष्ट.
रक्तात असलेली बंडखोरी धर्मबदल होऊन सुद्धा अबाधित राहिलेल्या बंडखोराची गोष्ट.
एका गुलामगिरीतून बाहेर पडून दुसऱ्या गुलामगिरीत होरपळणाऱ्या संपूर्ण प्रदेशाची गोष्ट.
इराण, पाकिस्तान, चीन ने अक्षरशः अनेक दशके लचके तोडलेल्या, स्वतःच्याच भूमीत गैर बनून राहिलेल्या, बुग्टी मराठे म्हणून ओळख असलेल्या बलोची माणसांची हि गोष्ट.
शेकडो वर्षे इराण्यांनी, अफगाण्यांनी, मुघलांनी, इंग्रजांनी बनवलेल्या सीमारेषांमध्ये स्वातंत्र्य गमावलेल्या एका दुर्दैवी 'देशाची' गोष्ट.
मराठ्यांच्या इतिहासाची देशाच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या वापराची हि गोष्ट. एका कधीही स्वतंत्र न झालेल्या देशाच्या स्वातंत्र्ययुद्धाची गोष्ट.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours