मानवाच्या सर्वांगीण विकासात क्रीडेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. क्रीडा ही केवळ शारीरिक क्षमता, ताकद किंवा कौशल्य यापुरती मर्यादित नसून, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाचीही प्रभावी प्रक्रिया आहे. उत्कृष्ट क्रीडा कामगिरीसाठी शारीरिक तयारीइतकीच मानसिक तयारी आवश्यक असते. याच मानसिक तयारीचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे क्रीडा मानसशास्र होय. क्रीडा मानसशास्र हे मानसशास्र आणि क्रीडा विज्ञान यांचा संगम असलेले एक उपयोजित शास्र आहे. हे शास्र खेळाडूंचे वर्तन, विचार, भावना, प्रेरणा, व्यक्तिमत्त्व, संघातील परस्परसंबंध आणि स्पर्धेतील मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करते, तसेच उत्कृष्ट कामगिरीसाठी आवश्यक असलेल्या मानसिक कौशल्यांच्या विकासासाठी वैज्ञानिक तंत्रांचा वापर करते. क्रीडा मानसशास्र हे क्रीडाविषयक मानसशास्रीय दृष्टिकोन विकसित करण्यास, मानसिक कौशल्ये आत्मसात करण्यास आणि क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक संधी समजून घेण्यास उपयुक्त आहे. प्रस्तुत पुस्तकात क्रीडा मानसशास्राची मूलतत्त्वे, व्यक्तिमत्त्व, प्रेरणा, सिद्धी प्रेरणा, Self-Determination Theory, Goal Setting Theory,, समूह प्रक्रिया, नेतृत्व, सामाजिक सुलभीकरण, मानसिक कौशल्य प्रशिक्षण (Mental Skills Training), मानसिक प्रतिमानिर्मिती, PETTLEP Model, Self-Talk, Mindfulness, Diaphragmatic Breathing, Progressive Muscle Relaxation (PMR), Self-Efficacy, Self-Compassion, Gratitude Practices, तणाव, चिंता, उद्दीपन, तसेच आधुनिक क्रीडा मानसशास्रातील संशोधनाधारित संकल्पनांचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाची संकल्पनात्मक समज विकसित होण्याबरोबरच परीक्षेची तयारी, स्पर्धा परीक्षा आणि प्रत्यक्ष क्रीडा क्षेत्रातील उपयोजन यासाठीही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours