Skip to product information
The Power of Your Subconscious Mind | Magal Te Milel by Joseph Murphy, Esther And Jerry Hicks avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 495.00 Regular price  Rs. 550.00
Pages: -
Language: Marathi

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे. • आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. • प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता. • हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. • आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.

• तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. • भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. • ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता. ————————————————————————————————————————– इच्छापूर्तीचे व अधिक आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या इच्छा प्रकट करायला शिकविणारे विलक्षण असे हे पुस्तक आहे. तुमचे नातेसंबंध, आरोग्य, आर्थिक व्यवहार, करिअर इत्यादी गोष्टींवर वैश्विक नियमांचा प्रभाव असतो व त्यांचे तुमच्या स्थळ-काळाशी निगडित असलेल्या वस्तुस्थितीवर नियंत्रण असते. त्यामुळे आयुष्यात कल्याणाचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी उपयुक्त असे अतिशय परिणामकारक उपाय या पुस्तकात आहेत. समृद्ध, परिपूर्ण व समाधानी आयुष्य जगणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अशा रीतीने जगण्याचा प्रत्येक मार्ग हे पुस्तक तुम्हाला दाखवते. अब्राहम-हिक्सच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने स्वत:च्या कल्याणासाठी इच्छा कशा प्रकट कराव्यात, याविषयाशी संबंधित आतापर्यंत सहाशेपेक्षा जास्त पुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ आणि सीडीज् ईस्थर आणि जेरी हिक्स यांनी प्रसिद्ध केल्या आहेत.

www.abraham-hicks.com ही त्यांची वेबसाइट आहे. “इतकं साधं, सरळ ; परंतु अतिशय प्रभावी असं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचलं. या पुस्तकामुळं एखाद्याचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं आणि हे किती प्रेमपूर्वक सांगितलंय! हे पुस्तक म्हणजे आयुष्यभराचा खजिनाच आहे!” – नील डोनाल्ड वॉल्श ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड’ या पुस्तकाचे लेखक “हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. मी आणि माझ्या पत्नीने अनेक वर्षांपासून अब्राहमच्या सखोल व अतिशय व्यावहारिक वचनांचा आस्वाद घेतला आहे. तुमच्यासाठीदेखील ते उपयुक्त ठरेल असा आमचा विश्वास आहे. माझ्या सर्व मित्रांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.” – जॉन ग्रे. ‘मेन आर फ्रॉम मार्स, वुमन आर फ्रॉम व्हिनस’ या पुस्तकाचे लेखक हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Power of Your Subconscious Mind | Magal Te Milel

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like