क्क्रुद्ध राजपुतांपासून दूर पळून, कुठे तरी आश्रय घ्यावा अशी जागाच मुगलांसाठी उरली नव्हती.
मुगलांनी निर्माण केलेला भयगंड एका उच्चतर आव्हानानच नष्ट केला जाऊ शकत होता आणि ते आव्हान होतं, दास्य झुगारून टाकण्यासाठी प्राणही पणाला लावण्याच्या सिद्धतेचं. हे आव्हान एकदा का स्वीकारलं की मनुष्य पूर्णपणे भयमुक्त होतो. त्याच्यातील संवेदना भौतिक जगातल्या नियमांच्या पार जाते आणि मग ती साका आणि जोहार यांच्या मुळाशी असलेल्या आध्यात्मिकतेचा आधार बनते.
जोहारात आत्मबलिदान देऊन महाराणी पद्मिनी देवानी हिंदु-मुस्लिम संघर्षाला नित्यरूप दिलं आणि त्या जोहारातल्या भडकलेल्या ज्वालांनी या रानटी शक्तिंबरोबर सहअस्तित्वाच्या सर्व शक्यता जाळून पोळून नष्ट केल्यात.
महाराणा हमीर यांनी मुहम्मद तुघलक याला सांगितलं की, 'तू यापुढे जर कधी चितोडवर आक्रमण केलं तर या चितोडदुर्गाचं रक्षण मी दुर्गाच्या आत राहून न करता सरळ बाहेर येईन अन् तुला नष्ट करीन.'
महाराणा कुंभ यांनी लिहिलेले सर्व ग्रंथ आणि साठ शिलालेख एकत्र केलेत तर आपल्या लक्षात येईल की मध्ययुगात भारतात कुंभ यांच्या इतका अद्वितीय राजा झाला नाही.
राव डोडिया यांनी विनंति केली, 'जर युद्ध व्हायचच असेल तर हिंदु योद्धघांच्या शवांवर करायचे अंत्यसंस्कार हिंदु पध्दतीनच व्हावेत' अकबरानं राजपुतांच्या या अटीला सन्मानपूर्वक मान्यता दिली.
एका देशाचे दोन विरुद्ध आदर्श होऊ शकत नाहीत. जर अकबर महान् असेल तर आम्हाला प्रतापांना विसरावं लागेल आणि जर प्रताप महान् असतील तर आम्हाला अकबराला नाकारावे लागेल!
या पुस्तकातून.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours