Skip to product information
Maharashatratil Char Sant Aani Vidvanacha Savala Gondhal| (महाराष्ट्रातील चार संत आणि विव्दानांचा सावळा गोंधळ| By  Bheemrao Bankhele |भीमराव बाणखेले
Rs. 0.00
Pages: 144
Language: Marathi
Overview:
संतांचे जीवनकार्य आणि साहित्य यावर आधुनिक काळात अनेक विद्वानांनी लिहिले. विश्लेषण केले. खरे तर भाविक, वारकरी नित्यनेमाने श्रीविठ्ठल आणि संतांच्या दर्शनाला जातात. वारी करतात. संतांनी लिहिलेल्य ग्रंथांची ते भक्तिभावाने पारायणे करतात.संत चरित्र किंवा संत साहित्याच्या विश्लेषणाच्या भानगडीत ते सहसा पडत नाहीत. त्यामुळे संतांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी विद्वानांकडून काय लिहिले जात आहे, याकडे त्यांचे लक्ष गेले नाही. दुसरीकडे या विद्वानांच्या लिखाणाची फारशी समीक्षाही झाली नाही.परिणामी अनेक लेखकांकडून सुशिक्षित, पांढरपेशा समाजापुढे संतांच्या चुकीच्या, अवास्तव प्रतिमा जात राहिल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या लिखाणावर कोणीतरी 'क्ष' किरण टाकण्याची गरज होती. ते काम 'महाराष्ट्रातील चार संत आणि विद्वानांचा सावळा गोंधळ' या पुस्तकातून झाले आहे.

You May Also Like