Skip to product information
Savitribai Phule | Mahatma Jotirao Phule by Shankar Karhade avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

इतिहास घडवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या बहुजन समाजाला इतिहासलेखनाचे मात्र भान नसावे, हे शल्य सर्वश्रुत सात शल्यांपेक्षाही अधिक जिव्हारी बोचणारे आहे. ते भान थोडे जरी असते, तरी सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या क्रांतिकारी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचे दाहक, विदारक तपशील असे कायमचे भूतकाळात गाडले गेले नसते. जोतीरावांचे मूलगामी चिंतन, दूरदर्शी विचार आणि देशी प्रतिभा थोडीफार तरी वाचकांपर्यंत पोहोचली, सावित्रीबाईंचे लेखन मात्र बव्हंशी कालगतच झालेले दिसते. तसा तर त्या उभयतांबाबत आजही ज्ञातापेक्षा अज्ञाताचाच प्रांत प्रचंड मोठा आहे. जोतीरावांच्याही आधी ज्यांच्या कवनांना प्रसिद्धीचा प्रकाश दिसला त्या सावित्रीबाईंच्या साहित्यिक आणि सामाजिक कर्तृत्वाची साक्ष देणारी । फारच थोडी साधने आज हाताशी आहेत.

त्यांचीच फिरवाफिरव करून उणीपुरी साठ छोटी-मोठी पुस्तके सावित्रीबाई फुल्यांवर प्रकाशित झाली असली तरी त्रुटी होती तशीच कायम आहे. जी. ए. उगले यांचे प्रस्तुत छोटेखानी पुस्तक प्रयत्नांची योग्य दिशा दाखवणारे आहे. लेखक फुले परंपरेचा आस्थेवाईक; पण अभ्यासपूर्ण शोध घेऊ पाहत असल्यामुळे त्यांच्या लेखनात अभिनिवेश, भावविवशता किंवा अतिशयोक्ती नाही. आधार नसेल तिथे तो नाही हे सांगण्याची सचोटी आहे. नवी माहिती मिळवून वाचकांसमोर ठेवण्याची डोळस धडपडही आहे.

उपलब्ध झालेले सर्व तपशील तपासून त्यात नवे गवसलेले जोडून उगले यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आणि काव्यावर येथे प्रकाश टाकला आहे. ————————————————————————————————————————- या देशातील गोरगरिबांचे, दीनदलितांचे रक्षणकर्ते आणि समाजातील घातक रूढी पंरपरांना विरोध करून त्या मोडणारे कर्ते समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव सर्वांनाच माहीत आहे. शेतकर्यांचे कैवारी, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते आणि स्त्रीशिक्षणाची देशात मुहूर्तमेढ रोवणार्या महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठीही काम केले आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना करणार्या महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. मुलांवर चांगले मूल्यसंस्कार करण्यासाठी महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांच्या माध्यमातून त्यांचे चरित्र इथे मांडले आहे. मुलावंर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच त्यांचे इतिहास आणि भूगोलाचे सामान्य ज्ञान अगदी सहज वाढविणारे हे पुस्तक विद्यार्थी वाचकांच्या बरोबरीनेच शिक्षक आणि पालक यांच्यासाठीही उपयुक्त आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Savitribai Phule | Mahatma Jotirao Phule

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like