Skip to product information
मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी|Marathi Bhasheche Sampraday Va Mhani
Rs. 140.00
Author: V. S. Apte
Language: Marathi

कै. वासुदेव गोविंद आपटे. (१८७१ - १९३० ) आनंद मासिकाचे संस्थापक हे मागच्या पिढीतील थोर साहित्यिक होते. त्यांनी १९२२ साली शब्द रत्नाकर हा मराठी - मराठी शब्दकोश तयार केला. वा. गो.

आपटे हे आंतरभारती चे पहिले प्रवर्तक होते. त्यांनी अनेक बंगाली कादंबऱ्या मराठीत आणल्या. त्यांनी कुमारांसाठी खूप लिहिले.मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी हे पुस्तक त्यांनी १९२० साली लिहून प्रसिद्ध केले. ह्या म्हणींच्या व वाक्संप्रदायांच्या छोट्या कोशात एकंदर २०६६ म्हणी व वाक्संप्रदायांचे अर्थ दिले आहेत. दाते - कर्वे यांच्या कोशासारखा हा सर्वसग्राहक कोश जरी नसला तरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व म्हणींचा व वाक्संप्रदायांचा अर्थ यात सापडेल. पुस्तकाच्या शेवटी वाक्संप्रदायांची व म्हणींची वर्णानुक्रमसूची दिलेली आहे.

त्यामुळे म्हण ताबडतोब शोधता येते स्कॉलरशिप परिक्षेच्या विद्यार्थ्यांना हा कोश फारच उपयोगी आहे. मराठी भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा कोश पुन्हा- पुन्हा वाचला पाहिजे.ह्या कोशाचा दुसरा विशेष म्हणजे २०६६ वाक्संप्रदाय व म्हणींपैकी बहुसंख्य म्हणींचे व वाक्संप्रदायांचे इंग्रजी पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ डोळे येणे याचा इंग्रजी पर्याय To have sore eyes असा दिला आहे. मराठी वाक्संप्रदाय किंवा म्हणी यांचा इंग्रजी अनुवाद करतांना अनेकांची त्रेधा- तिरपिट उडते. माझे डोळे आले हे इंग्रजीत लिहिताना sore eyes लिहिण्याऐवजी अनेकजण My eyes have come असे लिहितात ! म्हणींचे अर्थ व स्पष्टीकरणे अत्यंत समर्पक दिलेली आहेत उदाहरणार्थ एरंडाचे गु-हाळ याचा अर्थ ‘A Vain Effort असा दिलेला आहे.मराठी चे अभ्यासक व विद्यार्थी ह्या कोशाचे चांगले स्वागत करतील अशी खात्री आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Marathi Bhasheche Sampraday Va Mhani | मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like