Skip to product information
मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी|Marathi Bhasheche Sampraday Va Mhani
Rs. 140.00
Overview:
कै. वासुदेव गोविंद आपटे. (१८७१ - १९३० ) आनंद मासिकाचे संस्थापक हे मागच्या पिढीतील थोर साहित्यिक होते. त्यांनी १९२२ साली शब्द रत्नाकर हा मराठी - मराठी शब्दकोश तयार केला. वा. गो. आपटे हे आंतरभारती चे पहिले प्रवर्तक होते. त्यांनी अनेक बंगाली कादंबऱ्या मराठीत आणल्या. त्यांनी कुमारांसाठी खूप लिहिले.मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी हे पुस्तक त्यांनी १९२० साली लिहून प्रसिद्ध केले. ह्या म्हणींच्या व वाक्संप्रदायांच्या छोट्या कोशात एकंदर २०६६ म्हणी व वाक्संप्रदायांचे अर्थ दिले आहेत. दाते - कर्वे यांच्या कोशासारखा हा सर्वसग्राहक कोश जरी नसला तरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व म्हणींचा व वाक्संप्रदायांचा अर्थ यात सापडेल. पुस्तकाच्या शेवटी वाक्संप्रदायांची व म्हणींची वर्णानुक्रमसूची दिलेली आहे. त्यामुळे म्हण ताबडतोब शोधता येते स्कॉलरशिप परिक्षेच्या विद्यार्थ्यांना हा कोश फारच उपयोगी आहे. मराठी भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा कोश पुन्हा- पुन्हा वाचला पाहिजे.ह्या कोशाचा दुसरा विशेष म्हणजे २०६६ वाक्संप्रदाय व म्हणींपैकी बहुसंख्य म्हणींचे व वाक्संप्रदायांचे इंग्रजी पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ डोळे येणे याचा इंग्रजी पर्याय To have sore eyes असा दिला आहे. मराठी वाक्संप्रदाय किंवा म्हणी यांचा इंग्रजी अनुवाद करतांना अनेकांची त्रेधा- तिरपिट उडते. माझे डोळे आले हे इंग्रजीत लिहिताना sore eyes लिहिण्याऐवजी अनेकजण My eyes have come असे लिहितात ! म्हणींचे अर्थ व स्पष्टीकरणे अत्यंत समर्पक दिलेली आहेत उदाहरणार्थ एरंडाचे गु-हाळ याचा अर्थ ‘A Vain Effort असा दिलेला आहे.मराठी चे अभ्यासक व विद्यार्थी ह्या कोशाचे चांगले स्वागत करतील अशी खात्री आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like