भाषा हे संवादाचे माध्यम आहे. संवाद अधिकाधिक अर्थपूर्ण होण्यासाठी भाषेचे उत्तम आकलन झाले पाहिजे.
त्याकरिता भाषेचे व्याकरण नीट समजून घेतले पाहिजे. याच हेतूने शालेय स्तरापासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत मराठी व्याकरण हा अभ्यास विषय आवर्जून ठेवण्यात आला आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी व्याकरणाचे अंतरंग सोप्या भाषेत, उदाहरणांसह उलगडून दाखवणारे संदर्भ पुस्तक.
प्रत्येक प्रकरणाखाली दिलेले सरावासाठीचे प्रश्न आणि मराठी व्याकरणासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या व्याकरणकारांचा परिचय ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक वाचल्यावर मराठी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला भाषा बोलणे, लिहिणे व समजून घेणे शक्य होईल, हे निश्चित. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours