Skip to product information
निवडणूक प्रक्रिया | Nivadnuk Prakriya
Rs. 195.00

भारताने संसदीय लोकशाही व्यवस्था राज्यघटनेद्वारे स्वीकारली आहे. ही लोकशाही व्यवस्था निवडणूक प्रक्रियेद्वारे संक्रमित होते. सत्तेचे हस्तांतरण निवडणूक प्रक्रियेद्वारे होत असते. प्रस्तुत पुस्तकातून निवडणूक आयोगाचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेतील प्रशासकीय घटक, निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक मतदान केंद्र, मतदान अधिकार्‍यांची भूमिका, निवडणूक आचारसंहिता, राजकीय पक्ष, मतमोजणी इत्यादी सारख्या महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेच्या संकल्पनांवर भर दिला आहे. उमेदवाराचे नामांकन, मतदार नावनोंदणी, सामान्य मतदार यादी, उमेदवारांची पात्रता व निवडणूक प्रचार या संकल्पनांवर भर दिला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने भारतीय निवडणूक प्रक्रिया समजेल. ‘निवडणूक प्रक्रियेची’ सहज-सोप्या भाषेत ओळख होण्यासाठी या पुस्तकाची मांडणी केली आहे. आपल्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया जोपर्यंत सर्व भारतीयांना समजत नाही तोपर्यंत लोकशाही अधिक सक्रिय व जागृत निर्माण होणार नाही. भारतीय राज्यव्यवस्थेतील निवडणूक प्रक्रिया जोपर्यंत आपल्याला आपली वाटणार नाही, तोपर्यंत तिच्या माध्यमातून निर्वाचित होणारे लोकप्रतिनिधी योग्य, स्वच्छ प्रतिमेचे निवडून येणार नाहीत. त्यासाठीच सर्वसामान्य वाचकाला, विद्यार्थ्यांना व चोखंदळ वाचकांना ‘निवडणूक प्रक्रिया’ समजावी यासाठी हा लेखनप्रपंच व पुस्तकाची मांडणी केली आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

निवडणूक प्रक्रिया | Nivadnuk Prakriya

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like