Skip to product information
परंपरा आणि नवता’ या विषयासंबंधी विचार करीत असताना मला इथे ‘ललित वाङ्मयातील परंपरा व ललित वाङ्मयातील नवता’ असा विषय अभिप्रेत आहे… … परंपरा ही अशी चमत्कारिक गोष्ट असते की त्यातील चांगले हे त्याचे मूळ स्वरूप न बिघडवता त्यातील वाइटापासून क्वचितच वेगळे करता येते. जीर्णोद्धारवादी वृत्तीतून परंपरेतील सुट्या गोष्टींचे घडणारे संदर्भहीन दर्शन ही परंपरेची एक विटंबनाच असते. प्रतिभावंताचे परंपरेशी असलेले नाते याहून अगदी वेगळे असते; परंपरेत त्याला एकाच वेळी आधार आणि आव्हान ही दोन्ही दिसत असतात; आणि अशा परंपरेला सामोरे होताना तो जो नजराणा पुढे करतो त्याचेच नाव नवता. – गो.वि. करंदीकर
Pickup available at HO
Usually ready in 24 hours