भारतीय समाजव्यवस्थेत पारधी समाजाचे अस्तित्व अनादि कालापासून आहे, त्यासंबंधीच्या अनेक कथा, मिथके, संदर्भ पुराणकाळापासून उपलब्ध आहेत. गावरहाटीपासून अलिप्त राहणार्या ह्या समाजाची स्वतःची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.
त्यांचे लोकजीवन, लोकसंस्कृती, भाषा, सण-उत्सव, धार्मिक रूढी व परंपरा, दैवते ह्यांविषयी माहिती प्रस्तुत पुस्तकात आहे. पारधी समाजाची बोलीभाषा व त्यांची सांकेतिक भाषा, समाजाचे जातवास्तव आणि जातपंचायत, गावोगावी होणारे स्थित्यंतर ह्याची एकत्रित माहिती ह्या ग्रंथात दिली आहे.
एकूणच पारधी समाजाचा सर्वांगीण अभ्यास करून सिद्ध केलेला हा ग्रंथ मानवसमूहाच्या व समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल. एका उपेक्षित समाजाचे अंतरंग उलगडून दाखविणारा हा ग्रंथ संग्राह्य आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours