पर्यटन हा एकविसाव्या शतकातील सर्वाधिक गतिमान, बहुआयामी आणि वेगाने विकसित होणार्या सेवा उद्योगांपैकी एक आहे. आधुनिक जागतिक अर्थव्यवस्थेत पर्यटनाला विकासाचे प्रभावी साधन म्हणून मान्यता प्राप्त झाली असून, अनेक देशांच्या आर्थिक प्रगतीत त्याचा मोलाचा वाटा आहे. विशेषतः नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारशाने समृद्ध असलेल्या देशांसाठी पर्यटन हा परकीय चलन मिळवून देणारा, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणारा आणि प्रादेशिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उद्योग ठरला आहे. त्यामुळे आज पर्यटनाकडे केवळ मनोरंजन किंवा विरंगुळ्याचा विषय म्हणून न पाहता, शाश्वत आर्थिक विकास, सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक समन्वयाचे प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जाते. पर्यटन भूगोल हा केवळ पर्यटन स्थळांचा परिचय करून देणारा विषय नसून, तो मानव, पर्यावरण, संस्कृती आणि अर्थव्यवस्था यांचा परस्परसंबंध स्पष्ट करणारा महत्त्वपूर्ण अभ्यासविषय आहे. या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांमध्ये भूगोलाविषयीची आवड आणि संशोधनाची दृष्टी निर्माण करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. प्रस्तुत पुस्तकात सर्व घटकांचा समावेश करून प्रत्येक प्रकरण साध्या, सोप्या, सुसंगत आणि विद्यार्थिकेंद्रित भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या, तक्ते, नकाशे, उदाहरणे, महत्त्वपूर्ण संकल्पना, तसेच परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रस्तुत पुस्तक विद्यापीठीय परीक्षांसह NET, SET, UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठीही उपयुक्त ठरेल,
Pickup available at HO
Usually ready in 24 hours