‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्।’ हा खरा तर आयुर्वेदाचा मंत्र. निरोगी व्यक्तीला रोग होऊ नयेत म्हणून केले जाणारे प्रयत्न म्हणजेच स्वास्थ्यरक्षण होय. ह्यात आहाराचा फार मोठा सहभाग आहे. आजारी पडल्यावरही प्राथमिक उपचार करण्यास आहाराची मदत होते; तसेच आजारपणात हाच आहार ‘पथ्य’ म्हणून आपल्यासमोर येतो. अशाच दैनंदिन वापरातील भाज्या-फळे-धान्ये-उपवासाचे पदार्थ, तसेच पूजा साहित्य, ह्या विषयी डॉ. संजीवनी राजवाडे ह्यांनी या पुस्तकात सविस्तर संकल्पना मांडली आहे. ह्या पदार्थांचे गुणधर्म सविस्तरपणे सांगताना सहज-सोपे, पटकन् करता येतील असे उपायही सुचविले आहेत. वजननियंत्रक तक्ताही या पुस्तकात असून रक्तदाब (बी.पी.), रक्तशर्करा (शुगर), इत्यादी आजार असणार्यांनाही तो उपयुक्त ठरेल. लहान-थोर सर्वांनाच आहाराबाबत मार्गदर्शक ठरणारं हे पुस्तक (ऋतू संकल्पनेचा हा तिसरा भाग) इतर दोन पुस्तकांप्रमाणेच संग्राह्य आहे. लेखिकेविषयी... १. शालान्त परीक्षेत मराठी विषयात द्वितीय क्रमांक २. बी.ए.एम.एस.ला नागपूर विद्यापीठातून प्रथम क्रमांक. ३. आंतरशालेय स्पर्धांपासून राष्ट्रीय पातळीवरील अनेक वक्तृत्व, वादविवाद तसेच निबंध स्पर्धांमधून बक्षिसे व पारितोषिके. ४. २२ वर्षे मुंबईत वैद्यकीय व्यवसाय. ५. मी मराठी वाहिनीवरील 'लज्जतदार खाना' कार्यक्रमात गेली तीन वर्षे 'आरोग्य विचार'. ६. अनेक दिवाळी अंकांमधून वैद्यकीय व इतर साहित्य प्रकाशित. ७. लोकसत्तामध्ये वैद्यकीय लेखांना प्रसिद्धी. ८. साहित्य संमेलनांमधून सहभाग. ९. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित सामाजिक कार्य. १०. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग व अनेक सामाजिक संस्थांशी जवळचा संबंध. Paushatik Arogya - Dr Sanjeevani Rajwade पौष्टिक आरोग्य - डॉ. संजीवनी राजवाडे
Pickup currently not available
- Description
- Additional Information
No back cover available
Paushatik_Arogya

- Author: Dr Sanjeevani Rajwade
- Pages: 248
- Language: Marathi