Skip to product information
The Art Of Laziness | Positive Thinking | द आर्ट ऑफ लेझिनेस | पॉझिटिव्ह थिंकिंग | by Norman Vincent Peale avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 428.00 Regular price  Rs. 475.00
Pages: -
Language: Marathi

आळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. एकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा : उत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं. चालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं. ध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं.

आळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून योग्य पाऊल टाका. आपल्या रोजच्या कामकाजात भरभरून उत्साह व आनंद मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणारी ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने दिवसाची सुरुवात करा. तुमच्या जीवनात उद्देशांची भर पडली पाहिजे. तुमच्यामध्ये उत्साह आणि भक्कम आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी डॉ. पील यांनी साध्या; परंतु प्रभावी सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार वागल्यास तुमच्यात इच्छाशक्ती वाढेल आणि तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल.

नियोजनाचा आराखडा थोडक्यात; पण परिणामकारक असावा ज्यांचा परिणाम कायम राहू शकेल अशा गोष्टी, घटना विचारात घेतल्या पाहिजेत. त्यामळे मनातील शंकांचे निरसन होईल आणि भय निघून जाईल. त्यामुळेच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस उज्ज्वल होईल. विजयी भव, यशस्वी भव! तुम्ही जशी इच्छा कराल तसे होऊ शकाल. विजेता होणारा खेळाडू खेळ उत्कृष्टच खेळत असतो. तो जसा आज खेळतो तसाच उद्या खेळतो आणि त्यानंतरही तो तसाच खेळत असतो. आपणही आपले आयुष्य त्याच पद्धतीने जगायला हवे, असा विचार मनावर बिंबवला तर तुमच्या जीवनाला नवा उद्देश प्राप्त होईल. तुमच्यात तेवढी शक्ती आणि ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही विजेत्या खेळाडूसारखे जीवन जगू शकाल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Art Of Laziness | Positive Thinking | द आर्ट ऑफ लेझिनेस | पॉझिटिव्ह थिंकिंग |

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like