Skip to product information
The Power of Your Subconscious Mind | Prarthana Kara Chamatkar Ghadatil by Joseph Murphy avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 540.00 Regular price  Rs. 599.00
Pages: -
Language: Marathi

तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे. • आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. • प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.

• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. • आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. • तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. • भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. • ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता. ———————————————————————————————————————— तुमच्या अंतर्गत असणारी अमर्याद ऊर्जा तुम्हाला प्रोत्साहित करू शकते, रोगमुक्त आणि प्रेरित करू शकते; तसेच योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला सुखसमाधानाच्या, मुक्तीच्या, मनःशांतीच्या प्राप्तीसाठी योग्य मार्गावर नेऊन जीवनसाफल्याचा आणि परिपूर्णतेचा आनंद मिळवून देते. विभिन्न क्षेत्रातील अनेक लोक प्रगतीच्या वाटेवर सातत्याने महान गोष्टी हस्तगत करण्यात यशस्वी होतात.

ते शक्तिशाली, आरोग्यसंपन्न आणि उत्कट जीवनेच्छा बाळगून असतात. एवढेच नव्हे, तर मानवतेच्या कल्याणासाठी सर्वतोपरी झटत असतात. असे वाटते की, अशा कोणत्या तरी महान ऊर्जने ते भारलेले आहेत आणि ती ऊर्जाच त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. आपल्या आयुष्यातील समस्या आणि विफलता यांना यशस्वीरीत्या तोंड देऊन त्यांच्यावर मात कशी करावी, याची शिकवण हे पुस्तक देईल. प्रत्येक समस्या दैवीकृपेने सुटू शकते आणि त्या समस्येवर निर्धारपूर्वक विजय मिळवून नव्या दिवसाची पहाट आणि समाधानकारक नवीन आयुष्य कसे साकारता येईल, याचा उलगडा या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण करेल. या पुस्तकातून काय मिळेल? • नवीन मित्रांचा आणि हव्याहव्याशा लोकांचा सहवास • वेगवेगळ्या धोक्यांपासून संरक्षण • असाध्य समजल्या जाणाऱ्या व्याधींपासून रोगमुक्ती • आत्मअवहेलना आणि स्वतःला सतत दोष देण्यापासून मुक्तता • मुबलक संपत्ती, समाजमान्यता, मानसन्मान व मनापासून स्वागत, नवा जोम आणि आत्यंतिक उत्साह • वैवाहिक जीवनातील वैमनस्य दूर करून मनःशांती आणि सुख या परिवर्तनशील जगात निवांतपणाचा अनुभव • आणि या सर्वांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रार्थनेला मिळालेल्या इच्छित प्रतिसादाचा आनंद हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Power of Your Subconscious Mind | Prarthana Kara Chamatkar Ghadatil

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like