Skip to product information
Rajmata Jijau Marathi Book | Ramayan Mahabharatatil Niwadak by S. R. Deole avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 352.50 Regular price  Rs. 470.00
Overview:
एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये ! हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला. स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच! रामायण आणि महाभारत हे भारतीय महाकाव्य आहेत. भारतीय संस्कृतीचे दर्शन या महान ग्रंथातून घडते. असे म्हटले जाते, जगात जे आहे ते सगळे महाभारतात आहे. अशा या ग्रंथातील गोष्टी अनेक पिढ्यांतील मुलांवर सर्वांगीण संस्काराचे काम करत करत आल्या आहेत. आदर्श नागरिकाकरिता काय करावे. मुलात नेतृत्व गुण कसे वाढीस लावावे. देशप्रेम, मातृप्रेम आणि बंधुत्वाची आजची गरज. गोष्टीतून मनोरंजन आणि संस्काराची इथे वाढ होत जाते. गोष्ट वाचताना मजेदार खेळ खेळण्याचाही आनंद मिळतो. तर मग वाचा या गोष्टी! यातून मिळेल संस्काराचे अमृतमंथन.
Book cover type

You May Also Like