कोणतेही नातं जोडताना ते तोडण्याचा विचार कोणी करत नाही, पण ‘जमलं तर टिकवा नाही तर मिटवा’ ही वस्तुस्थिती स्वीकारून स्टेटस टाकून आपलं तुटलेलं नातं जगजाहीर करणाऱ्या जनरेशन झी त्याचे सेलिब्रेशनही करते, त्यांच्यासाठी रिलेशन्स : नातं तुटताना आणि नव्याने जुळवताना! नातं तोडणं एवढं सोपं असतं का? नातं तोडताना सूडबुद्धी असेल तर काय होतं? तुटलेल्या नात्यांचा मुलांवर काय परिणाम होतो? कशी हाताळावी ही परिस्थिती? ब्रेकअपमधून बाहेर पडल्यावर एकटचं राहावं, की नव्याने नातं जोडावं?
मनाचं मनाशी असलेले नातंही तुटतं का? कसं सावरायचं ते? या प्रश्नांची उत्तरे! प्रत्येकाला पटणारं, दिशा दाखवणारं--डोळ्यात पाणी आणणारं आणि भावणारं मानसशास्त्रीय समुपदेशन! लेखकाविषयी माहिती : लेखिका डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांनी एमएसडब्ल्यू, एलएलएम आणि लॉमध्ये पीएचडी केली आहे.
जानेवारी, १९९७पासून पुणे येथे समुपदेशक म्हणून त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र ज्युडिशियल अॅकॅडमी महिला व बालकल्याण विभाग प्रशिक्षण केंद्र, यशदा यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये समुपदेशन विषयक प्रशिक्षण व व्याख्याने त्या देत आहेत. वंचित विकासतर्फे कृतज्ञता राज्यस्तरीय पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार, कै. प्रेमाताई कामतेकर स्मृती पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. डॉ. जोशी यांची अर्थ नात्यांचा (कौटुंबिक समुपदेशन), लग्नाचा जीपीएस (विवाहपूर्व समुपदेशन) आणि कौटुंबिक वादासाठी विशेष न्यायव्यवस्था, कौटुंबिक न्यायालय ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours