Skip to product information
The Power of Your Subconscious Mind | Richest Man In Babylon by George S. Clason, Joseph Murphy avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 383.00 Regular price  Rs. 425.00
Language: Marathi

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे. • आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. • प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.

• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. • आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. • तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. • भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. • ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता. ———————————————————————————————————————— “मला हवं ते मिळविण्यासाठी मला सर्वप्रथम संपत्ती कशी मिळवतात याचा अभ्यास करावा लागेल, त्यासाठी वेळ द्यावा लागेल. ” जॉर्ज सॅम्युएल क्लॅसन यांचा जन्म 7 नोव्हेंबर, 1874 मध्ये मिझौरी येथील लुवीझियाना येथे झाला.

नेब्रास्का विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि स्पॅनिश-अमेरिकन युद्धात, ते अमेरिकन आर्मीमध्ये नोकरी करून सहभागी झाले होते. त्यांच्या प्रदीर्घ प्रकाशन व्यवसायाची सुरुवात त्यांनी डेन्व्हर कॉलरेडो येथे क्लॅसन मॅप कंपनी या प्रकाशन संस्थेची स्थापना करून केली. अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या रस्त्यांच्या नकाशाचे पहिले पुस्तक प्रकाशित करून त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. 1926 मध्ये त्यांनी काटकसर आणि आर्थिक यश यासंदर्भातील एक पत्रकांची मालिका प्रकाशित केली आणि अल्पावधीतच ती अत्यंत प्रसिद्ध झाली, त्यातील प्रत्येक मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी पौराणिक शहर बॅबीलॉनमधील नीतिकथेचा आधार घेतला. बँका आणि विमा कंपन्यांनी त्यांच्या पत्रकांचे मोठ्या प्रमाणात वितरण केले, त्यामुळे जॉर्ज क्लॅसन हे नाव लाखो लोकांना परिचित झाले. प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक असलेले ‘बॅबीलॉनचा धनाढ्य’ हे त्या अनेक प्रसिद्ध पत्रकांपैकी सर्वांत लोकप्रिय बोधकथेचे पुस्तक आहे. ‘बॅबीलॉनच्या नीतिकथा’ या आजच्या काळातही अत्यंत प्रेरणादायक आणि श्रेष्ठ कथा ठरल्या आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Richest Man In Babylon | द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like