Skip to product information
सामाजिक मानसशास्र | Samajik Manasshastra
Rs. 175.00

मानव हा स्वभावतः सामाजिक प्राणी आहे. त्याचे विचार, भावना, वर्तन, निर्णय आणि व्यक्तिमत्त्व यांवर समाजाचा सातत्याने प्रभाव पडत असतो. व्यक्ती आणि समाज यांच्यातील या परस्पर संबंधांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञान प्रधान युगात मानवी नातेसंबंध, सामाजिक मूल्ये, संवाद, गटवर्तन, नेतृत्व, पूर्वग्रह, सामाजिक प्रभाव आणि सामाजिक बदल यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. आज एकविसावे शतक चालू आहे. आजचे जग हे झपाट्याने बदलत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, जागतिकीकरण, शहरीकरण यांमुळे मानवी वर्तनात आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलांचे स्वरूप समजून घेण्यासाठी आणि व्यक्तीला समाजाशी संवाद साधण्यास मदत करण्यासाठी सामाजिक मानसशास्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. म्हणूनच या शाखेची व्याप्ती अत्यंत विस्तृत असून, ती शिक्षण, उद्योग, आरोग्य, राजकारण, न्यायव्यवस्था, कुटुंब, प्रसारमाध्यमे, पर्यावरण, डिजिटल जग आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहोचलेली आहे. सामाजिक मानसशास्र व्यक्तीचे सामाजिक वर्तन समजून घेण्यासाठी वैज्ञानिक आधार प्रदान करते. व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्परसंवादाचे विश्लेषण करून सामाजिक समस्यांचे आकलन, मानवी संबंधांची गुणवत्ता वाढविणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ज्ञान उपलब्ध करून देणे, हे या शाखेचे प्रमुख योगदान आहे. म्हणून सामाजिक मानसशास्र हा केवळ पुस्तकातील शिकवण्याचा विषय नसून, दैनंदिन जीवनात नाती जपण्यासाठी आणि अधिक समृद्ध करण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त व्यावहारिक मार्गदर्शक आहे. प्रस्तुत पुस्तकात वरील सर्व संकल्पना उदाहरणांसह देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांसह शिक्षक, संशोधक आणि सर्वसामान्य वाचकांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सामाजिक मानसशास्र | Samajik Manasshastra

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like