मा. लालकृष्ण अडवाणी, मा. अटल बिहारी वाजपेयी या मंडळींनी एक भारतीय विचारधारा जोपासत एका राजकीय पक्षाची स्थापना केली व या देशाला एका वेगळ्या ऐतिहासिक वाटेकडे नेण्यास सुरुवात केली. लेखकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट सोप्या भाषेत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानच्या शूर महाराणी ताराराणी तसेच मराठी साम्राज्याचे ग्वाल्हेर घराण्याचे महान पराक्रमी श्री. महादजी शिंदे व राजमाता विजयाराजे यांच्याबद्दलचेही लिखाण सदर पुस्तकात अत्यंत प्रेमाने केले आहे. गोव्यामध्ये हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन मंदिराची उभारणी करुन श्री. दयानंद बांदोडकर यांनी केले. जनतेला त्यांचे हक्क मिळवून दिले. अशा बांदोडकरांबद्दलही पुस्तकात आदराने काही माहिती दिली आहे. स्वातंत्र्योत्तर काळा भारताला विज्ञान युगाचे नायक बनवण्यात डॉक्टर जयंत नारळीकर यांचा सहभाग मोलाचा आहे. त्याचबरोबर पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी देखील एका समृद्ध वन संस्कृती परिवाराची वेगळी मांडणी केली आहे. त्याला ही स्पर्श या पुस्तकात केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज भागवत धर्म या सर्वांचा स्वराज्य निर्मितीपासून ते आजपर्यंत महाराष्ट्राला एक वैचारिक संस्कार मिळाला आहे. एकात्म मानवतावादाची एक नवीन वैचारिक प्रेरणा देणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची भारतीय विचारांची मांडणी देखील या पुस्तकात आली आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours