सर्वसामान्य मनुष्य आयुष्यात शिक्षण, नोकरी, वैवाहिक जोडीदार, यश, मानसन्मान व प्रतिष्ठा असे खूप काही मिळवतो, परंतु तरीदेखील त्याच्या मनात खोलवर कुठेतरी एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे, मी खरोखर आनंदी आहे का? माझ्या जीवनाला अर्थ आहे का? ‘समृद्ध जीवनाचे मानसशास्त्र’ हे पुस्तक अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक आशादायी, वैज्ञानिक आणि प्रेरणादायी प्रवास आहे. या पुस्तकाच्या वाचनातून असे लक्षात येईल की, आनंद हा नशिबाचा भाग नसून, तो शिकता येणारा, अंगीकारता येणारा आणि जोपासता येणारा सार्थ असा अनुभव आहे. हे पुस्तक सकारात्मक मानसशास्त्राच्या (झेीळींर्ळींश झीूलहेश्रेसू) आधारावर मानवी सामर्थ्ये, सकारात्मक भावना, मानसिक सुस्थिती आणि अर्थपूर्ण जीवन यांचा सखोल वेध घेते. भारतीय जीवनदृष्टी आणि पाश्चात्य वैज्ञानिक संशोधन यांचा सुंदर संगम साधत, वाचकाला केवळ समस्या कशा सोडवाव्यात यापलीकडे नेऊन जीवन कसं फुलवायचं हेही शिकवते. कृतज्ञता, सहानुभूती, तद्नुभूती, परोपकार आणि क्षमाशीलता या गुणांमुळे जीवन कसे समृद्ध करता येईल याविषयी पुस्तकात सहज आणि सोप्या भाषेतून, सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनाशी निगडीत असलेल्या उदाहरणांतून मर्म उलगडले आहे. मनसजगता, प्रवाहस्थिती, आध्यात्मिकता, वैयक्तिक ध्येय, स्व-नियमन आणि जीवनाचा अर्थ यांचा अभ्यास करताना हे पुस्तक वाचकाला स्वतःकडे पाहायला, स्वतःला समजून घ्यायला आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला प्रेरित करते. शेवटी, व्यक्तीपासून समाजापर्यंत सकारात्मक परिसंस्था उभारण्याचा विचार हे पुस्तक मांडते. या पुस्तकाच्या माध्यमातून- आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकतो . आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. आनंद हा प्रवास आहे, गंतव्य नव्हे हे आपल्या लक्षात येते. ‘समृद्ध जीवनाचे मानसशास्त्र’ हे पुस्तक आपल्याला स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय जीवन जगण्याची नवी उमेदही देते.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours