माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे संवादाचे माध्यम आणि स्वरूप झपाट्याने बदलत आहे. प्रिंट, रेडिओ, टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आणि नवसंवाद तंत्रज्ञान या सगळ्यांचा प्रभाव मानवी जीवनावर कसा पडतो, याचा शोध घेणे आजच्या संशोधनासाठी आवश्यक बनले आहे. संवाद ही मानवी समाजाची मूलभूत गरज आहे. परंतु संवादाची पद्धत आणि प्रभाव यांचा अभ्यास करणे हे केवळ भाषाशास्त्राच्या किंवा माध्यमशास्त्राच्या मर्यादेत राहणारे नाही. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटकांचा प्रभाव संवाद आणि माध्यमांवर कसा पडतो, हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. त्यामुळेच संवाद आणि मीडिया संशोधनाच्या माध्यमातून विविध सिद्धांत, संशोधन पद्धती, तंत्रज्ञानाच्या भूमिका आणि समाजातील बदल यांचा सखोल विचार या पुस्तकात केला आहे. जनसंवाद आणि पत्रकारिता या क्षेत्रात अभ्यासक्रमावर आधारित मराठी भाषेतील पुस्तक संख्या (हिन्दी आणि इंग्रजीच्या) तुलनेत कमी आहे. त्यानुषंगाने प्रस्तुत पुस्तक या क्षेत्रातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. संवाद आणि मीडिया संशोधन पद्धती या विषयावर सखोल विवेचन करणारे हे मराठी भाषेतील कदाचित पहिले संदर्भ पुस्तक आहे. प्रस्तुत पुस्तकात संवादाच्या बदलत्या स्वरूपाचा सखोल अभ्यास करून, त्याच्या संशोधनपर दृष्टिकोनाची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रयत्न परिपूर्ण आहे असा दावा नाही मात्र एक निश्चित संवाद आणि माध्यम संशोधन करिता हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours