भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह २९६ सदस्य संविधान सभेत होते. त्यांपैकी १५ सदस्य या महिला होत्या. या संविधान सभेची अनेक चर्चासत्रे होऊन प्रत्येक कलमावर वैचारिक चर्चा होऊन एकेक कलम हे निर्माण झालेले आहे. या चर्चांमध्ये या १५ महिला सदस्यांनी अनेक सूचना आणि मुद्दे मांडून संविधान निर्मितीच्या या चर्चेत अतुलनीय योगदान दिलेले आहे. कारण, संविधान सभेतल्या या चर्चांमधूनच संविधानातील कलमे व पोटकलमे निर्माण झालेली आहेत. या चर्चेत भाग घेणार्या या महिला सदस्यांची ओळख भारतीय नागरिकांना आणि संविधानाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना व्हावी. त्यांचे योगदान लक्षात यावे, या भूमिकेतून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours