Skip to product information
सफर | Saphar
Rs. 105.00
Pages: 45
Language: Marathi

विजय तेंडुलकर यांच्या नाट्यप्रवासातील एक विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आशयांबरोबर त्यांना योग्य अशा आविष्कारपद्धतींचा अवलंब केला किंवा त्या नव्याने निर्माण केल्या. सुरुवातीच्या ‘श्रीमंत’, ‘माणूस नावाचे बेट’ सारख्या नाटकांत त्यांनी पारंपरिक सामाजिक नाटकाचा ढाचा वापरला तर ‘सरी ग सरी’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘गिधाडे’ किंवा ‘विठ्ठला’ या नाटकांत आशयभिन्नतेनुसार वेगवेगळ्या आविष्कारपद्धती स्वीकारल्या. ‘सफर’ या नाटकातला अनुभव अनेकपदरी आहे. आपण ज्या ‘मूड’मध्ये हे नाटक वाचू, ऐकू किंवा पाहू त्यानुसार याची वेगवेगळी रूपे दिसू लागतील. वरवर पाहता ही एका काहीशा मतिमंद वाटणाऱ्या माणसाची काल्पनिक सायकल सफर आहे. या नाटकाकडे निखळ गंमत म्हणूनही पाहता येईल किंवा यातल्या घटनांमध्ये लपलेले अर्थही शोधता येतील, ही नुसती गंमत मानली तरी ती जाता जाता सबंध आयुष्याला गवसणी घालणारी. विजय तेंडुलकर यांच्या ध्वनिफितीवरील वाचनात यातील बारकावे अधिक स्पष्ट होतात. या ‘ अनुभव नाटकाची’ ही संहिता.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सफर | Saphar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like