अर्थशास्त्रात 'सार्वजनिक आयव्यय / सार्वजनिक वित्त' (Public Finance) ही एक अत्यंत महत्त्वाची, व्यावहारिक आणि गतिमान शाखा मानली जाते; जी प्रामुख्याने सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि वित्तीय प्रशासन या चार मुख्य स्तंभांचा अभ्यास करते. प्रस्तुत पुस्तकात सार्वजनिक वित्त व्यवहारांची ओळख, डॉ. डाल्टन यांचा कमाल सामाजिक लाभाचा सिद्धांत आणि सार्वजनिक खर्चाच्या प्रवृत्तींसह बॅनरचा नियम व पिकॉक वाइजमन गृहितक यांचे सखोल विश्लेषण केले आहे. तसेच, सार्वजनिक महसूल, , सार्वजनिक कर्ज, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करप्रणाली, करघाताचे सिद्धांत व दुहेरी करआकारणी यांसारख्या क्लिष्ट संकल्पनांची अत्यंत सुलभ आणि सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. तसेच, देशातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सार्वजनिक वित्त व्यवहार हे कसे एक प्रभावी साधन ठरते, यावर सुद्धा प्रकाश टाकला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाच्या मूल्यमापन आकृतीबंधानुसार परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न देण्यात आले असून, हे पुस्तक अध्यापनात प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात आणि परीक्षेच्या यशात अत्यंत मार्गदर्शक ठरेल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours