Skip to product information
Share Market Sanch| शेअर मार्केट संच
Rs. 800.00
Pages: 632
Language: Marathi

टेक्निकल अॅनालिसिस मेड इझी
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्टॉक मार्केटचा रहस्यभेद करा !
ट्रेडिंगमध्ये तुम्ही नवखे असाल, किंवा अनुभवी असाल, तरी देशाचे आघाडीचे लेखक सुनील गुर्जर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाची तुम्हाला मदतच होईल. भूतकाळातली किमतीची माहिती, तांत्रिक इंडिकेटर्स आणि चार्ट पॅटर्न्सचा योग्य उपयोग करून ट्रेडिंगसंबंधी योग्य निर्णय कसे घ्यायचे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल.
किमतीची भविष्यकालीन हालचाल कशी असेल, याचा अंदाज लावण्यासाठी तांत्रिक विश्लेषण मूव्हिंग अॅव्हरेजेस, रिलेटिव्ह स्ट्रेन्यू इंडेक्स् आणि कैंडलस्टिक पॅटर्न्स या साधनांवर अवलंबून असते. सपोर्ट आणि रेझिस्टन्स्च्या पातळीचा अर्थ तावायला तुम्ही शिकाल, महत्त्वाचे ट्रेंड तुम्ही ओळखायला शिकाल आणि मूव्हिंग अॅव्हरेज कन्व्हर्जन्स् डायव्हर्जन्स्सारख्या ऑसिलेटर्सचा वापर करायला आणि स्टॉकॅस्टिक इंडिकेटर्सचा वापर करून ट्रेडिंगची अचूक वेळ कशी साधायची हे तुम्ही शिकाल. या पुस्तकात अनेक क्लिष्ट संकल्पना विस्तृतपणे समजावून सांगितलेल्या आहेत :
हेड अॅण्ड शोल्डर्स, डबल टॉप्स् आणि फ्लॅग्ज्सारखे बुलिश आणि बेअरिश चार्ट पॅटर्न्स कसे ओळखायचे ?
एन्ट्री आणि एक्झिटचे बिंदू शोधण्यासाठी फिबोनाच्या रिट्रेसमेंटचा वापर कसा करायचा ?
बाजाराचा मोमेन्टम शोधण्यासाठी मूव्हिंग अॅव्हेज आणि ट्रेंड लाइन्स् कशा वापरायच्या?
स्टॉप लॉस आणि पोझिशन सायझिंग करून जोखीम व्यवस्थापनाची धोरणे कशी अमलात आणायची ?
व्हॉल्यूम इंडिकेटर्सचा वापर करून किमतीची दिशा आणि बाजाराची मानसिकता कशी समजून घ्यायची ?
व्यावसायिक गुंतवणूकदार बाजाराचे विश्लेषण कसे करतात, त्यांची प्रत्यक्ष उदाहरणे वाचा आणि तुमच्या आर्थिक भविष्यकाळाची सूत्रं स्वतःच्या ताब्यात घ्या.
सुनील गुर्जर (CFTe, CMT) हे 'ब्रेकआउट ट्रेडिंग मेड इझी' आणि 'मेक मनी विय प्राइस अॅक्शन ट्रेडिंग' या दोन राष्ट्रीय खपाच्या लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. मुंबईमधल्या वित्तीय शिक्षण आणि सेवा देणाऱ्या अल्फामोजो या फर्मचे ते संस्थापक आहेत. ते शेअर बाजारात पूर्णवेळ ट्रेडिंग करतात आणि आलेखांच्या विश्लेषणाचे ते तज्ज्ञ आहेत.

ब्रेकआउट ट्रेडिंग मेड इझी
शिकण्यासाठी सोप्या असलेल्या ब्रेकआउट ट्रेडिंगच्या तंत्रांच्या आधारे स्टॉक मार्केटमध्ये अधिक यश मिळवा!
लोकप्रिय लेखक सुनील गुर्जर यांच्या 'ब्रेकआउट ट्रेडिंग मेड इझी' पुस्तकाच्या साहाय्याने ट्रेडिंगच्या यशस्वी प्रवासासाठी तयार व्हा. ट्रेडिंगच्या धोरणांमध्ये चार्ट पॅटर्न्स किती महत्त्वाचे असतात. हे गुर्जर यांनी स्वतःच्या ट्रेडिंग अनुभवांच्या आधारे व्या पुस्तकात सांगितले आहे. या तंत्रांच्या मदतीने त्यांनी स्वतःच्या भांडवलात अनेकपट वाढ केली तसेच बाजारातील मंदीच्या किंवा सतत चढउतारांच्या काळात स्वतःचे संरक्षणही केले.
ब्रेकआउट ट्रेडिंगचे अनेक महत्त्वाचे पैलू या पुस्तकातून जाणून घेता येतात. सपोर्ट आणि रेझिस्टन्स् हे गुर्जर यांच्या धोरणाचे प्रमुख आधार आहेत. कँडलस्टिक न्चार्टस् आणि प्रत्यक्ष उदाहरणांच्या साहाय्याने त्यांनी योग्य ब्रेकआउट कसा शोधायचा आणि खोटा ब्रेकआउट कसा ओळखायचा, हे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
ब्रेकआउट ट्रेडिंगची समग्र माहिती देणारे हे पुस्तक किमतीचे योग्य उद्दिष्ट ठरवणे, धोरणात्मक स्टॉप-लॉस लावणे, जोखीम व्यवस्थापन करणे आणि जास्तीतजास्त फायदा मिळवणे यांसारखी महत्त्वाची कौशल्ये शिकवते. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या या तंत्रांमुळे तुम्हाला स्टॉक्स्चे व्यवहार करताना -आत्मविश्वासाने आणि संपूर्ण माहितीच्या आधारे निर्णय घेता येतील.
तुमच्या ट्रेडिंग प्रवासाचा कायापालट करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? सुनील गुर्जर (CFTE, CMT) हे 'मेक मनी विय प्राइस अॅक्शन ट्रेडिंग' या राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. मुंबईतील वित्तीय शिक्षण आणि सेवा देणाऱ्या 'चार्टमोजो' या संस्थेचे ते संस्थापक आहेत. ते पूर्णवेळ शेअर बाजारात ट्रेडिंग करतात आणि चार्ट विश्लेषणातील तज्ज्ञ आहेत.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Share Market Sanch| शेअर मार्केट संच

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like