Skip to product information
Smaranyatra | स्मरणयात्रा By Savita Damle| सविता दामले
Sale price  Rs. 158.00 Regular price  Rs. 210.00
Pages: 136
Language: Marathi

तसं पाहिलं तर शब्दांकन हा एक मुलाखतीचाच प्रकार असतो परंतु यात मुख्य फरक असा की मुलाखतकार हा वेगळी व्यक्ती म्हणून प्रश्न विचारत असतो आणि ज्याची मुलाखत घ्यायची तो त्या प्रश्नांची उत्तरे देतो.
परंतु शब्दांकनात मात्र मुलाखतकार हा स्वतःचं व्यक्तित्व विसरून जातो आणि ज्याची मुलाखत घ्यायची त्याच्यात जणू तो परकायाप्रवेश करतो. ज्याच्या जीवनाचे शब्दांकन करायचे त्याला तो नानाविध प्रश्न विचारतो, त्याच्याशी मोकळेपणी गप्पा मारतो. त्याच्या आठवणी, आयुष्यातले प्रसंग आणि शब्दांकनाचा काही विशेष विषय असेल तर त्या विषयानुसार त्याची मतं, त्याची माहिती ही सगळी घेतो. आणि त्यानंतर मग प्रथमपुरुषी एकवचनात म्हणजे स्वतःच ती व्यक्ती आहे असे समजून हे शब्दांकन करतो.
वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळेच सुप्रसिद्ध लोक स्वतः लेखक असतात असे नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखे भरपूरच असते परंतु आपल्याला स्वतःला लेखन करता येईल का ? आपल्याला ते ओघवत्या भाषेत मांडता येईल का? अशी त्यांना शंका असते, अशा वेळेस शब्दांकनकार त्यांच्या मदतीला येतात.
या पुस्तकात ज्येष्ठ लेखिका अनुवादक सविता दामले यांनी अशाच अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांना वाचकांपुढे सादर केले आहे; अगदी जसेच्या तसे.
'ऋतुरंग' या दिवाळी अंकातील, वाचकांच्या पसंतीस उतरलेली शब्दांकने पुस्तकरूपाने एकत्र येत आहेत, जेणेकरुन वाचकांना त्याचा एकत्रित रसास्वाद घेता येईल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Smaranyatra | स्मरणयात्रा By Savita Damle| सविता दामले

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like