तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्टॉक मार्केटचा रहस्यभेद करा !
ट्रेडिंगमध्ये तुम्ही नवखे असाल, किंवा अनुभवी असाल, तरी देशाचे आघाडीचे लेखक सुनील गुर्जर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाची तुम्हाला मदतच होईल. भूतकाळातली किमतीची माहिती, तांत्रिक इंडिकेटर्स आणि चार्ट पॅटर्न्सचा योग्य उपयोग करून ट्रेडिंगसंबंधी योग्य निर्णय कसे घ्यायचे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल.
किमतीची भविष्यकालीन हालचाल कशी असेल, याचा अंदाज लावण्यासाठी तांत्रिक विश्लेषण मूव्हिंग अॅव्हग्रेजेस, रिलेटिव्ह स्ट्रेन्यू इंडेक्स् आणि कँडलस्टिक पॅटर्न्स या साधनांवर अवलंबून असते. सपोर्ट आणि रेझिस्टन्स्च्या पातळीचा अर्थ लावायला तुम्ही शिकाल, महत्त्वाचे ट्रेंड तुम्ही ओळखायला शिकाल आणि मूव्हिंग अॅव्हरेज कन्व्हर्जन्स् डायव्हर्जन्स्सारख्या ऑसिलेटर्सचा वापर करायला आणि स्टॉकॅस्टिक इंडिकेटर्सचा वापर करून ट्रेडिंगची अचूक वेळ कशी साधायची हे तुम्ही शिकाल. या पुस्तकात अनेक क्लिष्ट संकल्पना विस्तृतपणे समजावून सांगितलेल्या आहेत :
हेड अॅण्ड शोल्डर्स, डबल टॉप्स् आणि फ्लॅग्ज्सारखे बुलिश आणि बेअरिश चार्ट पॅटर्न्स कसे ओळखायचे ?
B
एन्ट्री आणि एक्झिटचे बिंदू शोधण्यासाठी फिबोनाच्या रिट्रेसमेंटचा वापर
कसा करायचा ? बाजाराचा मोमेन्टम शोधण्यासाठी मूव्हिंग अॅव्हरेज आणि ट्रेंड लाइन्स् कशा वापरायच्या?
स्टॉप लॉस आणि पोझिशन सायझिंग करून जोखीम व्यवस्थापनाची धोरणे कशी अमलात आणायची?
व्हॉल्यूम इंडिकेटर्सचा वापर करून किमतीची दिशा आणि बाजाराची मानसिकता कशी समजून घ्यायची ?
व्यावसायिक गुंतवणूकदार बाजाराचे विश्लेषण कसे करतात, त्यांची प्रत्यक्ष उदाहरणे वाचा आणि तुमच्या आर्थिक भविष्यकाळाची सूत्रं स्वतःच्या ताब्यात घ्या.
सुनील गुर्जर (CFTe, CMT) हे 'ब्रेकआउट ट्रेडिंग मेड इझी' आणि 'मेक मनी विथ प्राइस अॅक्शन ट्रेडिंग' या दोन राष्ट्रीय खपाच्या लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. मुंबईमधल्या वित्तीय शिक्षण आणि सेवा देणाऱ्या अल्फामोजो या फर्मचे ते संस्थापक आहेत. ते शेअर बाजारात पूर्णवेळ ट्रेडिंग करतात आणि आलेखांच्या विश्लेषणाचे ते तज्ज्ञ आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours