Skip to product information
The Art Of Laziness | The 5 Second Rule | द आर्ट ऑफ लेझिनेस | द फाईव्ह सेकंड रूल | by Mel Robbins avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 431.25 Regular price  Rs. 575.00
Overview:
आळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. एकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा : उत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं. चालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं. ध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं. आळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. • ध्येयसिद्धी कठीण वाटते? • व्यायाम, छंद, नातेसंबंध यांच्यासाठी वेळ नाहीये? • सुखसमृद्धीचा मार्ग सापडत नाहीये? • आयुष्याची गाडी रुळावर आणायचीय? तुम्ही पाच अंक मोजू शकत असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता! वाचून आश्चर्यचकित झालात? पण हे पूर्णत: सत्य आहे. मानसशास्त्रीय कसोट्यांवर तावून-सुलाखून निघालेला पाच सेकंदांचा जादुई नियम तुम्हाला पुढील क्षेत्रांत वापरता येईल : • आपलं व्यक्ति गत व व्यावसायिक आयुष्य समृद्ध करण्यासाठी • आत्मविश्वास कमावण्यासाठी • निरामय नातेसंबंधांसाठी • तुमच्या स्वप्नपूर्ती, ध्येयपूर्तीसाठी • स्वतःतील सर्वोच्च क्षमता वापरता येण्यासाठी • आणि कल्पनातीत असं आयुष्य जगण्यासाठी तुम्ही तत्काळ कृती करायला प्रेरित व्हावं यासाठी हा नियम एक ब्लू प्रिंट आहे. जगभरात दहा मिलियन लोक हा नियम वापरत आहेत. मग, तुम्ही वाट कसली बघताय?
Book cover type

You May Also Like