Skip to product information
The Richest Man In Babylon | The Art Of War by George S. Clason, Sun Tzu avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 337.50 Regular price  Rs. 450.00
Overview:
“मला हवं ते मिळविण्यासाठी मला सर्वप्रथम संपत्ती कशी मिळवतात याचा अभ्यास करावा लागेल, त्यासाठी वेळ द्यावा लागेल. ”जॉर्ज सॅम्युएल क्लॅसन यांचा जन्म 7 नोव्हेंबर, 1874 मध्ये मिझौरी येथील लुवीझियाना येथे झाला. नेब्रास्का विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि स्पॅनिश-अमेरिकन युद्धात, ते अमेरिकन आर्मीमध्ये नोकरी करून सहभागी झाले होते. त्यांच्या प्रदीर्घ प्रकाशन व्यवसायाची सुरुवात त्यांनी डेन्व्हर कॉलरेडो येथे क्लॅसन मॅप कंपनी या प्रकाशन संस्थेची स्थापना करून केली. अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या रस्त्यांच्या नकाशाचे पहिले पुस्तक प्रकाशित करून त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. 1926 मध्ये त्यांनी काटकसर आणि आर्थिक यश यासंदर्भातील एक पत्रकांची मालिका प्रकाशित केली आणि अल्पावधीतच ती अत्यंत प्रसिद्ध झाली, त्यातील प्रत्येक मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी पौराणिक शहर बॅबीलॉनमधील नीतिकथेचा आधार घेतला. बँका आणि विमा कंपन्यांनी त्यांच्या पत्रकांचे मोठ्या प्रमाणात वितरण केले, त्यामुळे जॉर्ज क्लॅसन हे नाव लाखो लोकांना परिचित झाले. प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक असलेले ‘बॅबीलॉनचा धनाढ्य’ हे त्या अनेक प्रसिद्ध पत्रकांपैकी सर्वांत लोकप्रिय बोधकथेचे पुस्तक आहे. ‘बॅबीलॉनच्या नीतिकथा’ या आजच्या काळातही अत्यंत प्रेरणादायक आणि श्रेष्ठ कथा ठरल्या आहेत. ————————————————————————————————————————- लौकिकार्थाने फारसा प्रसिद्ध नसलेला, सैन्यातील अधिकारी व त्याचबरोबर पंडित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सन त्झु नावाच्या चिनी व्यक्तीने ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे शीर्षक वाचल्यास हे पुस्तक युद्धात वापरायच्या डावपेचांबद्दल आहे असे वरकरणी वाटते. हे पुस्तक क्रौर्यास उत्तेजन देते असाही एक लोकप्रिय आणि प्रचलित असा गैरसमज आहे;परंतु हे खरे नाही. एवढेच नाही तर पुस्तकाचे नाव ‘दी आर्ट ऑफ वॉर’ असूनही हे पुस्तक युद्धशास्त्राबद्दल नाही तर हे पुस्तक नीतिमत्तेबद्दल, सहिष्णुतेबद्दल आहे. जीवनात संघर्षाचा सामना करावा लागला तरीही आक्रमक भूमिका न घेता संघर्ष कसा टाळावा, उभय पक्षांची हानी टाळून कशा प्रकारे मार्ग काढावा याबद्दल प्रकांड विचारशीलता आणि बुद्धिमत्तेचा वापर करीत सल्ला दिला आहे. हे पुस्तक इतके जुने असूनही त्याने आपला कालातीतपणा सिद्ध केला आहे. आजही त्याचा अभ्यास जगभरातील सैनिकी विद्यालयांत केला जातो. यातील डावपेच, युद्धातील परिस्थितीबरोबरच इतर पार्श्वभूमीवर व युद्धेतर परिस्थितीतदेखील परिणामकारक सिद्ध होतात. तुमच्या तीव्र स्पर्धात्मक जीवनात संघर्ष हाताळण्याचा परिणामकारक, आध्यात्मिक व सहानुभूतीपूर्ण मार्ग शिकायचा असेल, जीवनातील ध्येयाची स्पष्ट अनुभूती करून घ्यायची असेल व अत्यंत बिकट परिस्थितीतही मनःशांती अनुभवायची असेल तर ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
Book cover type
  • Description
  • Additional Information
The Richest Man In Babylon | The Art Of War

No back cover available

  • Author: George S. Clason, Sun Tzu
  • Language: Marathi
×

You May Also Like