महेंद्र सिंग धोनीच्या शांत आणि स्थिर चेहऱ्यामागे काय दडलं आहे ?
एका दशकाहून जास्त काळ, महेंद्र सिंग धोनी याने क्रिकेट विश्वाला आणि करोडोंच्या वर भारतीयांना आपल्या कप्तानपद, यष्टीरक्षण आणि फलंदाजीतील चातुर्याने मोहित केलं आहे. भरत सुंदरेसन यांनी रांची आणि इतर ठिकाणी जाऊन, त्याच्या जवळच्या मित्रांच्या गाठीभेटी घेऊन त्याचा एक लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. त्यातून, धोनीच्या आयुष्यातील विविध कंगोऱ्यांना स्पर्श झाला आहे. यात रांचीचा मुलगा, एक फौजी, एक मुत्सद्दी कर्णधार, चेन्नईचा प्रेमस्वरूप थाला, यष्टीरक्षणातील पायथागोरस या त्याच्या अंगभूत कौशल्यांचा समावेश आहे. त्याला या व्यक्तिमत्त्वाविषयी अशीही काही माहिती मिळाली ज्याचे थेट वर्णन करणे कठीण आहे.
ज्या व्यक्तीमध्ये अशी जादू आहे की, जिचा हात-धोनी टच (धोनीचा परिसस्पर्श) फिरला की, त्याच्या अवतीभवती येणाऱ्या सर्वांवर त्याचा परिणाम होतो, सोबत त्या वृद्धींगतही होतात. मजेशीर, प्रांजळ आणि खुमासदार किस्से यांचा भरणा असलेलं 'द धोनी टच' हे पुस्तक एका सर्वसामान्य व्यक्तीचं असामान्य जग आपल्यापुढे मांडतं.
―ルーミー
धोनीला नेहमीच सर्वत्र प्रेम, आदर मिळाला आहे तरीही तो गूढ आहे. मग आपल्याला त्याच्याविषयी अधिक जाणून घ्यायचे नाही का? मला घ्यायचे आहे. आणि एका वार्ताहराने, भरतने लिहिलेलं हे पुस्तक त्यासाठी मदत करतं.
हर्ष भोगले
भारतातील सर्वात स्टायलिश आणि जिज्ञासू क्रिकेट लेखकाने, हेलिकॉप्टर शॉट मारणाऱ्या खेळाडूवरील पडदा उचलला आहे. ज्याने त्यांच्या देशातील क्रिकेटचा चेहरा मोहराच बदलून टाकला त्या खेळाडू आणि कप्तानाच्या जीवनाचं जवळून दर्शन होतं.
अली मार्टिन, गाडियन
Pickup available at HO
Usually ready in 24 hours