Skip to product information
ऑस्कर वाइल्ड यांची द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे ही जागतिक साहित्यातील अजरामर अभिजात कादंबरी आहे. देखणा तरुण डोरियन ग्रे कायम तरुण राहण्याची इच्छा व्यक्त करतो आणि त्यानंतर त्याचे चित्रच त्याच्या पापांचे, नैतिक अधःपतनाचे व काळाच्या खुणांचे प्रतिबिंब बनते. सुख, सौंदर्य आणि भोग यांच्या मोहात अडकत तो विवेक, करुणा आणि नैतिकतेपासून दूर जातो. मानवी स्वभावातील लोभ, अहंकार, अपराधीपणा आणि आत्म्याची किंमत यांचा वेध घेणारी ही कादंबरी गूढ, तत्त्वचिंतनात्मक आणि मानसशास्त्रीय आशयाने समृद्ध आहे. सौंदर्याच्या आभासी जगामागील कटू सत्य उलगडणारे हे साहित्य आजही तितकेच प्रभावी आणि विचारप्रवर्तक ठरते.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours