Skip to product information
Sale price
Rs. 208.00
Regular price
Rs. 260.00
Overview:
The Secret Mission | द सिक्रेट मिशनधनेशने पोलिस व्हॅन मधेच थांबवली. बुरखाधारी आणि जगदाळे अचंबित नजरेने धनेशकडे बघत होते. इन्स्पेक्टर धनेशने निर्विकार चेह-याने खिशातल्या पिस्तुलाकडे हात नेताच जगदाळे हादरले. बुरखाधारी तर चळाचळा कापायलाच लागला. ‘‘साहेब, काय करताय ? ह्या झाडीत निर्जन आडवाटेला गाडी का थांबवली तुम्ही ? तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ?'' एकावर एक प्रश्न... पण धनेशच्या चेह-यावरून त्याच्या पुढच्या चालीचा अंदाजच लागत नव्हता. त्याने पिस्तूल बुरखाधा-याच्या कनपटीवर टेकवत हातातले कागद त्याला दिले. हा अडाणी जंगली माणूस इंग्लिशमधले कागद कसे वाचणार ? साहेब हे काय करताहेत ? जगदाळेंना कळतच नव्हते. बुरखाधा-याने कागदांवर नजर टाकली अन् धनेशच्या पायांवर लोळण घेतली. नेमका आहे तरी काय हा सगळा प्रकार ? धनेशने कोणते पेपर्स त्याला दाखवले ? काय होते त्यात ? कोणत्या रहस्याचा खुलासा करणार होती ती कागदपत्रे ? धनेश अखेरीस करणारच का बुरखाधा-याचा एन्काउन्टर ? का ? काय आहे काय हे ?

Pickup currently not available