"ब्रिटिश लेखक ‘एच. जी. वेल्स’ हे विज्ञानकथांचे जनक! ‘ द टाइम मशीन’ ही टाइम ट्रॅव्हलिंगची कल्पना मांडणारी पहिली कादंबरी. भविष्यकाळातून प्रवास करून वर्तमानात आलेल्या या वैज्ञानिकाला काय दिसलं?
""मानवजात उत्तम घरांमध्ये राहत असल्याचं, सुंदर कपडे परिधान करत असल्याचं मी पाहिलं आणि तरीही ती कठोर परिश्रम करत असल्याचं मला आढळलं नाही. संघर्षाची कोणतीच लक्षणं नव्हती... ना सामाजिक, ना आर्थिक... दुकानं, जाहिराती, रहदारी या आपल्या जगाचा मुख्य भाग असणार्या सर्व गोष्टी नाहीशा झाल्या होत्या.”
संघर्ष कमी करत नेणं, निसर्गावर विजय मिळवत जाणं, हे माणूस आदिम काळापासून करत आला आहे. पण ‘संघर्ष संपणं’ हा माणसाचं अस्तित्व संपण्याचा इशारा आहे.
विजय मिळवणं नव्हे, तर एकमेकांसोबत आणि निसर्गाशी समांतर चालत राहणं हाच ‘माणूस’ नावाच्या जमातीचा अखेरचा बचाव आहे. वेल्स कदाचित हेच सुचवू पाहत आहेत...
रोमांच, कल्पनाशक्ती आणि तत्त्वचिंतन यांचा संगम असलेली ही कादंबरी विज्ञानकथेच्या इतिहासातला एक मैलाचा दगड मानली जाते. काळ, प्रगती आणि मानवी समाजाच्या भवितव्याबद्दल विचार करायला लावणारी ‘द टाइम मशीन’ ही प्रत्येक वाचकाने अनुभवावी अशी अविस्मरणीय सफर आहे
Pickup available at HO
Usually ready in 24 hours