प्रसन्न घर ही आपल्या संस्कृतीतल्या घरासाठीची पूर्वअट आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाला आपलंसं वाटेल ही घरासाठीची आणखी एक पूर्वअट इंटिरीअर डिझायनिंग करताना वरील दोन बार्बीना सर्वाधिक महत्त्व आहे, कारण आपलं घर हे आपलं असतं आणि घरातल्या प्रत्येकाला सुखावह वाटेल असंच घराचं इंटिरीअर असावं लागतं. इंटिरीअर डिझायनिंग करताना ते आपल्याला सोयीचं आहे का, हा विचारही सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे इंटिरीअरची जबाबदारी तज्ज्ञावर सोपवली, तरीही आपले 'इनपुट्स' त्याचं मोल वाढवतात.
उपलब्ध जागेचा पुरेपूर आणि न्याय्य वापर करणारं डिझाईन ही आजच्या काळाची गरजच आहे. घर नेटक, आटोपशीर आणि कलात्मकतेशी नातं राखणारं असेल, तर त्याचा संपूर्ण कुटुंबावर एक विधायक परिणाम होतो. म्हणूनच घराचं इंटिरीअर हा विषय घरातल्या सर्वांनीच समजून घ्यायला हवा.
इंटिरीअर डिझायनिंग या विषयाची समज आणखी विस्तारण्यासाठी हे पुस्तक तुमचा एक उत्तम सोबती होईल. पाहा तर वाचून !
Pickup available at HO
Usually ready in 24 hours