Skip to product information
Dhammapada | Tyagmurti Mata Ramai | धम्मपद गौतम बुद्ध | त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर | by Vijay Shivram Gavare avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Language: Marathi

धम्मपद’ हा बौद्ध साहित्यामधील एक अत्यंत महत्त्वाचा व प्रेरणादायी ग्रंथ आहे. बुद्धांच्या उपदेशांचा सार या ग्रंथात संकलित करण्यात आला आहे. साध्या, प्रभावी आणि हृदयाला भिडणाऱ्या गाथांमधून जीवन जगण्याची दिशा, नीती, नैतिकता आणि आध्यात्मिक मूल्ये यांचा सखोल विचार यात मांडलेला आहे. ‘धम्मपदा’तील प्रत्येक गाथा म्हणजे एक जीवनसूत्र आहे. त्या वाचकाला अंतर्मुख करतात, विचार करायला भाग पाडतात आणि दैनंदिन जीवनात अनुसरण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे हा ग्रंथ फक्त धार्मिक किंवा तात्त्विक संदर्भापुरता मर्यादित न राहता प्रत्येक सामान्यांतील सामान्य माणसासाठी मार्गदर्शक ठरतो. धम्मपद हे पुस्तक… * विद्यार्थ्यांसाठी चारित्र्य घडवणारे * अभ्यासकांसाठी ज्ञानवर्धक * वाचकांसाठी आत्मिक शांती देणारे * सर्वांसाठी आयुष्य समृद्ध करणारे आहे. जगभरात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या आणि अनुवादित झालेल्या ग्रंथांपैकी एक असलेले ‘धम्मपद’ आजही तेवढेच कालसुसंगत आहे. मानवी जीवनातील अंधार घालवून अंतर्मनातील प्रकाश शोधण्यासाठी या ग्रंथासारखा शाश्वत साथीदार दुसरा नाही. त्या मातेनं तरी किती दुःख सोसायचं. भीमा विलायतेला होता तेव्हा तिनं रात्रंदिवस प्रपंचाची काळजी वाहिली. त्याची वकिली सुरू होईपर्यंतसुद्धा शेणाचा भार डोक्यावर वाहायला तिला कमीपणा वाटला नाही.

दारोदार शेणाच्या गोवर्‍या विकायलाही ती लाजली नाही. थकली नाही, दमली नाही. स्वत: वाट्टेल तेवढे कष्ट उपसत राहिली. कधी पोटभर जेवली नाही. कुटुंबासाठीच कष्ट करीत राहिली. अशा या ममताळू, सुशील व पूज्य मातेच्या वाट्याला तरी असं अघोरी दुःख यायला नको होतं. देव तरी किती दुष्ट. अशाच पुण्यवान माणसांच्या पाठीशी लागतो. त्यांच्यासमोर दुःखाचे डोंगर उभे करतो. या देवाला देव तरी का म्हणावं आणि कसं म्हणावं? जो त्याला मनापासून मान देतो, त्याचाच तो घास घेतो. मग देव आहे की देव नावाचं थोतांड?

दुःखाअंती सुख असते, असे म्हणतात; पण आंबेडकर घराण्याला मात्र दुःखच दुःख सोसावे लागत होते. यानंतर कितीही सुख मिळाले तरी सोसलेल्या दुःखाची किंचितही भरपाई होणार नव्हती. झालेली हानी भरून निघणार नव्हती. काहींच्या दुःखाला निदान सीमा तरी असतात; पण या घराण्याच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्यांचे दुःख म्हणजे अथांग समुद्र होता. त्यांच्या दुःखाने आकाशसुद्धा भरून गेले तरीही त्यांचे दुःख उरतच राहिले. या दुःखाच्या मागे समाजव्यवस्थेचा, आर्थिक विवंचनेचा वणवा होता; तरीही ध्येयवादाची महत्त्वाकांक्षा होती. कष्टाअंती विश्रांती हवी असते; पण तीही या कुटुंबाला नव्हती. अविश्रांत कष्ट करूनही पोटातील भुकेचा वणवा शमविता येत नव्हता. कच्चीबच्ची मुले भुकेने व्याकूळ होत होती. औषधपाण्याविना गंगाधरसारखं लाडकं बाळ मरणाच्या दारी गेलं. आई – बापाचं हृदय किती विदीर्ण झाले असेल, चाळणीच्या छिद्रांसारखे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Dhammapada | Tyagmurti Mata Ramai | धम्मपद गौतम बुद्ध | त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर |

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like