Skip to product information
Overview:
मराठीतील गूढ, भय आणि कल्पनारम्य साहित्याला वेगळी उंची देणारे नारायण धारप यांच्या अप्रकाशित कथांचा हा विशेष संग्रह. 'विकल्प' ही कथा वाचकाला भीतीच्या गूढ अरण्यात घेऊन जाते, तर 'चिंतामणी वय १०, शोधताना!' या कथेतून कल्पनारम्य विश्वाचा वेगळाच अनुभव मिळतो. मिश्कील आणि नर्मविनोदी शैलीत लिहिलेली 'शमसो' ही दीर्घकथा धारपांच्या नेहमीच्या भयलेखनापेक्षा वेगळी छाप पाडते. 'भीती : एक अभ्यास' ही कथा भीतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडते. याशिवाय धारपांनी अनुवादित केलेल्या 'काळरात्र' आणि 'काळा डुईड' या कथांचाही या संग्रहात समावेश आहे. धारपांच्या लेखनातील भय, गूढ, फँटसी, विनोद आणि वैचारिकता यांचा व्यापक आवाका उलगडून दाखवणारा, आजही तितकाच ताजा आणि प्रभावी वाटणारा कथासंग्रह — 'विकल्प आणि इतर कथा'.

Pickup currently not available