हुकूमशाही ही एका व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेचा परिणाम असते, की हुकूमशाही ही एका व्यक्तीच्या रूपात प्रकट होणारी सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थिती असते ? जनसमुदाय स्वतःच आत्मघातकी होऊन, डोळे झाकून एखाद्या नायकाच्या पावलावर पाऊल टाकून आपोआप चालू लागतात, असे काही क्षण समाजांच्या आणि राष्ट्रांच्या जीवनात येतात का ? आज एकविसाव्या शतकातील इतक्या पारदर्शक काळातसुद्धा हुकूमशाही एखाद्या नवीन रूपात समोर येईल का? आज आपण जगातील लोकशाही देशांमधील आघाडीचा देश आहोत. या प्रश्नांच्या प्रकाशात आपण स्वतःकडे पाहिल्यास आपल्याला काय दिसत आहे? आपण कुठे आहोत ?’विसाव्या शतकातील हुकूमशाह’ हे पुस्तक व्यापक स्वरूपात याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेते. आज आपल्या सर्वांसमोरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हिटलर, स्टॅलिन, मुसोलिनी, उत्तर कोरियाचा किम इल सुंग, चिलीचा ऑगस्टो पिनोशे आणि युगांडाचा ईदी अमीन यांच्यावर हे पुस्तक बेतलेले आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात या नेत्यांच्या तत्कालीन अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या निर्णायक आयामांवर प्रकाश टाकतानाच या लोकांचा उत्कर्ष कसा झाला, त्यांचे पतन कसे झाले आणि जगाने, जगातील विचारवंतांनी त्यांच्याकडे कसे पाहिले, त्यांना समजून कसे घेतले या गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे.
इतिहासाचे अभ्यासक म्हणून अशोक कुमार पांडेय इतिहासातील काही प्रकरणे वाचकांसमोर ठेवतात. आजच्या काळातील प्रश्नांशी त्या प्रकरणांचा थेट संबंध आहे. या सगळ्या प्रक्रियेत विचार हाच त्यांचा सोबती आहे.हे पुस्तक या प्रवासातील आणखी एक पाऊल असून आपल्या काळाचा विचार करण्यासाठी आणि आपण कोणती बाजू निवडावी याकरिता ते वाचकांना नक्कीच मदत करेल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours